Goa News |Waste management Dainik Gomantak
गोवा

Goa News: मडगावचा कचरा आता साळगावात!

Goa News: सोनसोडो कचरा प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: मडगाव येथील कचऱ्याची समस्या जटील बनली आहे. सोनसोडो येथे कचऱ्याचे मोठे ढीग आहेत. आणखी कचरा घालण्यास पुरेशी जागा नाही. त्यामुळे नगरपालिकेने मडगावमधील कचरा दररोज साळगाव येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त करून हा कचरा पुढील आठवड्यापासून साळगाव प्रकल्पात पाठविण्यास सुरवात होईल.

गोवा कचरा व्यवस्थापन मंडळानेही असा कचरा दररोज साळगाव येथील प्रकल्पात पाठविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मडगावमधील कचऱ्याची समस्या अंशता कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोनसोडो कचरा प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा आहे. त्यामुळे दररोज एकत्र केलेल्या कचऱ्याचे काय करायचे, हा प्रश्र्न आमच्यापुढे आहे. येथे जो 10 टन कचरा एकत्रित झाला आहे तो दररोज साळगाव प्रकल्पात पाठविला जाईल. त्यासाठी आम्ही वाहनांची व्यवस्था करीत आहोत, असे मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो यांनी पत्रकारांना सांगितले.

तीन महिन्यांपूर्वीच हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिडेट कंपनीमार्फत गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने सोनसोडो येथील 14380 क्युबिक मीटर कचऱ्याची विल्हेवाट लावलेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT