Goa Sharadotsav 
गोवा

Goa Sharadotsav: शारदोत्सवानिमित्त मडगावात मनोरंजन कार्यक्रमांची धमाल!

Goa Sharadotsav: विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Sharadotsav: श्री सरस्वती सेवक मंडळाचा शारदोत्सव 5 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत कोंब-मडगाव येथील श्री दामोदर विद्याभुवनात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

बुधवारी सकाळी 7.30 वा. उदय घोडे यांच्या अंबाजी येथील निवासस्थानाहून श्रींची दामोदर विद्याभुवनपर्यंत बॅण्ड पथकासोबत मिरवणूक निघेल. नंतर पूजा-अर्चा व श्रींची स्थापना केली जाईल. संध्याकाळी 5.30 वा. श्री सत्यसाई सेवा समितीतर्फे भजनांचा कार्यक्रम होईल. रात्री 8 वा. आरती, तीर्थप्रसाद होईल.

गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून धार्मिक विधी व आरती होईल. संध्याकाळी 6 वा. मुंबईस्थित गोमंतकीय गायक संजय कोरगावकर प्रस्तुत ‘सात रंग के सपने’ हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून धार्मिक विधी, आरती, संध्याकाऴी 5.15 वा. श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे गौरव व्यास व विद्यार्थी प्रस्तुत ‘आनंद नर्तना’ हा नृत्य कार्यक्रम, 6.45 वा.

महिला मंडळ प्रस्तुत ‘आश्‍विन संध्या’ हा कार्यक्रम सादर केला जाईल. नंतर आरती, तीर्थप्रसाद व पावणीने उत्सवाची सांगता होईल. शारदोत्सवातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शैलेश कारे, दामोदर नाईक, दलाल कुटुंबीय, माधव तालक कुटुंबीय, गुरुदास शेणवी कारे कुटुंबीय आणि रामचंद्र पै रायतूरकर कुटुंबीयांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT