Sal River Pollution | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Sal River Pollution: साळ नदी बनली गटारगंगा!

Sal River Pollution: नदीच्या काठावर मुख्यतः मासेमारी करणारा समाज रहात असून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

दैनिक गोमन्तक

Sal River Pollution: संपूर्ण सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली साळ नदी सध्या पूर्णपणे प्रदूषित झाली असून, मानवी मलमूत्र थेट या नदीत सोडून दिल्याने या नदीतील मासे खाणेही धोक्याचे बनले आहे.

वेर्णापासून बेतूलपर्यंत वाहणारी साळ ही सासष्टी तालुक्यातील महत्त्वाची नदी असून या नदीच्या काठावर असलेल्या लोकवस्तीसाठी सर्व बाजूंनी ती जीवनवाहिनी ठरलेली आहे. या नदीच्या काठावर मुख्यतः मासेमारी करणारा समाज रहात असून याच नदीच्या माशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

मात्र आज या काठावर राहणारी लोकवस्तीच तिच्या मुळावर आली आहे, असे म्हणावे लागेल. काही दिवसांपूर्वी शिरवडे नावेली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी साळ नदीत सोडून देण्याच्या प्रकार उघडकीस आला होता.

त्यानंतर त्यावरून बाणावलीचे आमदार वेंझी विएगस आणि पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्यात वादही झाला होता. साळ नदीच्या प्रदूषणावरून काब्राल यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

नावेली-कोलमरड या भागात तर या नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांचे मलमूत्र नाल्यातून थेट या नदीत सोडले जात असल्याने या नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे, अशी माहिती या भागात राहणारे सावियो डायस यांनी दिली.

हे प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर ही नदी पूर्णतः खराब होणार असून त्यासाठी आताच खबरदारीचे उपाय घेतले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

एकेकाळी दळण वळणाचा मार्ग

साळ नदी ही जरी आता गटारगंगा झाली असली तरी एकेकाळी ही नदी व्यापारी नौकांसाठी एक महत्त्वाचा दुवा होता. याच नदीच्या मुखावर आज ज्याला खारेबांध म्हणतात तिथे महत्त्वाचे बंदर होते आणि अरब देशांतून आणला गेलेला माल येथे उतरविला जात होता. मात्र, आता येथे या बंदराचे अस्तित्वच गायब झाले आहे.

  • सांडपाणी थेट सोडण्‍यात येत असल्‍याने प्रदूषण

  • नदीतील मासे खाणेही बनले अत्‍यंत धोक्याचे

  • वेळीच लक्ष न दिल्‍यास भविष्‍यात संकट अटळ

"मडगाव येथून पाच ठिकाणी प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी सरळ या नदीत सोडून दिले जात असून याची पूर्ण माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला असूनही हे प्रदूषण थांबविण्यासाठी काहीच पाऊले उचलली जात नाहीत, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे."

- वेन्‍झी व्हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT