Mapusa Municipality News: म्हापसा पालिका प्रकाश झोतात! 'खरी कुजबुज'

म्हापशात मोटोक्रॉस चॅम्पियनशीपमध्ये झालेल्या अपघातावेळी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Mapusa Municipal Council | Goa News
Mapusa Municipal Council | Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापशात मोटोक्रॉस चॅम्पियनशीपमध्ये झालेल्या अपघातावेळी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी या स्पर्धेच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

दुसरीकडे, ही स्पर्धा भरविण्यासाठी इतर सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली होती का? तसेच स्थानिक पालिकेने सर्व काळजी घेत आयोजकांना हे मैदान उपलब्ध करून दिले होते का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

मुळात शेतजमिनीत रेस ट्रॅक बनविण्यास पालिकेने परवानगी दिलीच कशी? हा प्रमुख प्रश्न विचारला जात आहे. याविषयी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत म्हापसा पालिकेस लक्ष्य केले. त्यामुळे पोलिस पालिकेने दिलेल्या परवान्यांची चौकशी करणार का? हा प्रश्न आहेच.

अशावेळी म्हापसा पालिका पुन्हा एकदा या प्रकारामुळे प्रकाशझोतात आली आहे, एवढे मात्र नक्की!

तथाकथित कार्यकर्त्याला घडली अद्दल

स्वतःला स्वघोषित धर्मरक्षक म्हणवून घेत असलेल्या एका कार्यकर्त्याची काही दिवसांपूर्वी मडगावच्या एका नगरसेवकाने उडविलेल्या खिल्लीचा विषय सध्या मडगाव येथे चर्चेचा ठरला आहे.

त्याचे झाले असे की या कार्यकर्त्याने परत आपली पूर्वीची कर्मे सुरू केल्यावर त्या नगरसेवकाने त्याला सबुरीचा सल्ला दिला होता. त्याचाच राग असल्याने की कोण जाणे काही दिवसांपूर्वी त्या नगरसेवकाशी त्याची रस्त्यात एका कार्यक्रमात गाठ पडल्यावर त्याने सरळ त्या नगरसेवकांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तो नगरसेवकही तेवढाच खमक्या निघाला. त्यानेही त्याच्यावर दोन तीन लगावून दिल्यावर येथे आपले काही चालणार नाही याची जाणीव झाल्याने त्या कार्यकर्त्याने तिथून निमूटपणे पाय काढला.

केविलवाणी धडपड!

म्हापशात रविवारी मोटोक्रॉस स्पर्धेवेळी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनापासून ते या रेसच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टीका व प्रश्न विचारले जाताहेत. अशातच, म्हापसा पालिकेचे काही नगरसेवक तिथे हजर होते.

त्यामुळे हा आणखीन चर्चेचा विषय बनला आहे. त्यानुसार, माध्यमाचे प्रतिनिधी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असताना काहींचे फोन कव्हरेज एरियाच्या बाहेर, तर काहीजण फोनच उचलत नव्हते! हा प्रकार पाहून या प्रकरणापासून होईल तितके लांब राहण्याची ही संबंधितांची केविलवाणी धडपडच म्हणावी लागेल! ∙∙∙म्हापशात रविवारी मोटोक्रॉस स्पर्धेवेळी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनापासून ते या रेसच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टीका व प्रश्न विचारले जाताहेत. अशातच, म्हापसा पालिकेचे काही नगरसेवक तिथे हजर होते. त्यामुळे हा आणखीन चर्चेचा विषय बनला आहे.

त्यानुसार, माध्यमाचे प्रतिनिधी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असताना काहींचे फोन कव्हरेज एरियाच्या बाहेर, तर काहीजण फोनच उचलत नव्हते! हा प्रकार पाहून या प्रकरणापासून होईल तितके लांब राहण्याची ही संबंधितांची केविलवाणी धडपडच म्हणावी लागेल!

आरोलकरांनी जिंकले बालकांचे ह्रदय!

‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ हे संतांचे बोल आपण ऐकलेच असणार. बालदिन म्हणजे आपल्या बालमित्रांसाठी पर्वणीच. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी बालदिन बालकांच्या सहवासात राहून साजरा केला.

जमिनीवर खाली बसून ते लहान मुलांत मिसळले. लहान मुलांशी लहान होऊन त्यांनी संवाद साधला. मांद्रेतील मुलेही जीत अंकलबरोबर मनसोक्तपणे खेळली. काही का असेना जीत आरोलकर यांनी बालकांची मने जिंकली हे मात्र नक्की. ∙∙∙‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’ हे संतांचे बोल आपण ऐकलेच असणार.

बालदिन म्हणजे आपल्या बालमित्रांसाठी पर्वणीच. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी बालदिन बालकांच्या सहवासात राहून साजरा केला. जमिनीवर खाली बसून ते लहान मुलांत मिसळले.

लहान मुलांशी लहान होऊन त्यांनी संवाद साधला. मांद्रेतील मुलेही जीत अंकलबरोबर मनसोक्तपणे खेळली. काही का असेना जीत आरोलकर यांनी बालकांची मने जिंकली हे मात्र नक्की.

सरकारी सहल

सध्या राज्यात देवदर्शन यात्रेचा हंगाम सुरू झाला आहे. वास्तविक या देवदर्शन यात्रेला कोणाला जाता येईल याचे नियम नक्कीच असतील, पण आपल्याच कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी सर्व ठिकाणाहून वयाची तीस वर्षे पूर्णही न केलेले आणि दुसरे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षाला एकदा एलटीए मिळतोच.

असे असतानाही बरेच सरकारी कर्मचारी या यात्रेत आपले हात धुवून घेऊ लागले आहेत. मग ही मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा राज्यातील अडल्या नडल्या वयस्कर लोकांसाठी की पक्षाचे चोख काम केले म्हणून सरकारी खर्चातून सहल आयोजित केली आहे हे जनतेला कळायला हवे.

कारण हा जनतेचा पैसा आहे असा सूर राज्यात उमटू लागला आहे. सरकारी योजना असल्यास स्थानिक पंचायत, नगरपालिका कार्यालयात अर्ज उपलब्ध न करता थेट आपल्याच कार्यकर्त्यांना हुडकून काढण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते फिरू लागल्याने जनता प्रश्न उपस्थित करू लागली आहे.

Mapusa Municipal Council | Goa News
Mapusa Municipality News: म्हापसा पालिका प्रकाश झोतात! 'खरी कुजबुज'

चर्चिल इरमांवचे गणित

ऐंशीच्या दशकात गोव्याच्या विशेषतः सासष्टीतील राजकारणात उतरलेले चर्चिल आलेमांव हे एक असे रसायन आहे की त्यांची राजकीय गणिते भल्या भल्यांना अजून कळू शकलेली नाहीत. त्यांनी जसा निवडणुकीत अनेकांचा पराभव केला तसाच ते स्वतःही पराभूत झाले आहेत, पण म्हणून सासष्टीच्या राजकारणातून त्यांना वगळून चालत नाही असे मानले जाते.

गत विधानसभा निवडणुकीनंतरची त्यांची चाल अशीच अनेकांना कोड्यात पाडणारी आहे. एसटी नेते अँथनी बार्बोझा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लावलेली उपस्थिती व तेथे सदानंद तानावडे व इतरांशी केलेली चर्चा म्हणूनच अनेकांना कोड्यात पाडणारी ठरली. त्यामुळे रेजिनाल्डबाबही अस्वस्थ झाले नाहीत म्हणजे मिळवले.

महापौर साहेब, भाटले दौरा कधी?

महापौर रोहित मोन्सेरात यांनी नुकताच पणजी शहरातील कामांचा आढावा घेतला. कामाचा वेग वाढविण्याचा आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आता या आदेशाला अधिकारी किती गांभिर्याने घेतात ते पाहावे लागेल.

महापौरांनी शहराच्या विविध भागांचाही दौरा करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करू लागले आहेत. भाटले परिसरात जलवाहिनीचे काम झाल्यानंतर खड्डे मात्र अजूनही तसेच पडून आहेत. रस्त्याची पूर्ण ‘वाट’ लागली आहे.

या रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत असल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागते. अपघातांची शक्यता आहेच, अशा स्थितीत महापौर साहेबांनी थोडा वेळ काढून या भागाचा दौरा करावा यासंदर्भात भाटलेवासीयांत चर्चा होऊ लागली आहे.

ट्रक पार्किंगची गंभीर समस्या

आर्लेम येथे नुवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्क केल्या जाणाऱ्या लांबलचक ट्रक, ट्रॉल्या, टँकर यामुळे जी धोकादायक स्थिती निर्माण होते, त्याबद्दल रायमधील लोकांनी रस्त्यावर येऊन विरोध दर्शविल्यावर संबंधित यंत्रणा जागी झाली.

हे आता नित्याचेच झाले आहे. विविध सरकारी यंत्रणा आपणहून अशा प्रकारांची दखल घेत नाहीत व त्यामुळे लोक रस्त्यावर येतात. गोव्यात अनेक शहरात मालवाहू वाहनांच्या पार्किंगची समस्या होऊ लागली आहे.

त्याचा विचार करूनच 2005 मध्ये माडेल येथील जमीन ट्रक टर्मिनससाठी निश्चित केली गेली होती व नंतर तिचे संपादनही झाले होते, पण नंतर त्यात राजकारण आडवे आले. त्यामुळे अनेक भागात ट्रक पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com