Goa Murder Case |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: अख्तरच्या खुनासाठी त्याच्याच गाडीचा केला वापर

Goa Murder Case: संदीप गुप्ता याने हा खून करताना स्वतःची गाडी न वापरता अख्तरच्याच गाडीचा वापर केला

दैनिक गोमन्तक

Goa Murder Case: कुठल्याही परिस्थितीत अख्तरचे पैसे चोरायचेच ही योजना केलेल्या संदीप गुप्ता याने हा खून करताना स्वतःची गाडी न वापरता अख्तरच्याच गाडीचा वापर केला. नेसाय कालव्याच्या बाजूने संदीप अख्तरला घेऊन गेला आणि सिगारेट ओढायच्या बहाण्याने त्याने अख्तरला किनाऱ्यावर आणले आणि तिथे कुणी नसल्याचे पाहून आपला डाव साधला.

13 नोव्हेंबर रोजी हा खून करण्यात आला होता. मात्र, त्याला वाचा फुटली 17 नोव्हेंबर रोजी. मृत अख्तर रझा कुसनुर याच्या मालकीची ही स्कूटर खून झाल्यानंतरही संशयिताच्याच ताब्यात होती. ती कुडतरी पोलिसांनी जप्त केली.

आज त्याच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड संपल्यावर संशयित संदीप गुप्ता याला पुन्हा मडगाव न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलिस कोठडीचा रिमांड 10 दिवसांनी वाढवून दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी संदीप अख्तरला सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने आडोशाला घेऊन गेला. त्यावेळी तिथे अन्य कुणीच नव्हता. त्याचाच फायदा उठवत प्रथम संदीपने अख्तरला मारहाण करण्यास सुरवात केली व त्याचा गळा आवळून खून केला.

नंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर दगड घालून तो विद्रूप केला. नंतर अख्तरचीच स्कूटर घेऊन तो घरी आला.

संशयित संदीप गुप्ता हा मूळ बिहारचा असला तरी मागची 16 वर्षे तो दिकरपाली येथे भुसारी दुकान चालवीत होता. अख्तरशी त्याची दोस्ती होती. त्याला जुगारासह अनेक प्रकारची व्यसने होती. त्यामुळेच तो कर्जबाजारी बनला होता. मासे विकणारा अख्तर हा पैसेवाला असल्याची माहिती असल्यानेच संदीपने त्याला आपले सावज केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT