Savio Coutinho |Goa News Dainik Gomantak
गोवा

Savio Coutinho: मिश्र कचऱ्याने खोलगट जागा बुजविण्याचे प्रकार

Savio Coutinho: जुना बाजार परिसरात दुर्गंधी

दैनिक गोमन्तक

Savio Coutinho: फेब्रुवारी 2022 पर्यंत सोनसोडोवरील कचरा साफ करण्‍याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. तरीही रेमेडिएशन केलेला कचरा हटवण्याचे काम सुरू केले आहे. या भागातील कचरा म्हणून सरळ मिश्र स्वरूपाचा कचरा घालून रवींद्र भवन जवळील सखल भाग बुजविला जात आहे, असा आरोप शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केला.

या भागात या कचऱ्याचा भराव घालून जागा बुजवली जात असताना जुन्या बाजार परिसरात मात्र असह्य दुर्गंधी पसरली आहे. सध्या या भागातील लोकांसाठी हा कचरा म्हणजे एक डोकेदुखी बनली आहे. कुतिन्हो यांनी माध्यम प्रतिनिधींसमवेत या भागाला भेट देऊन या कचऱ्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर असलेले प्लास्टिक दाखवले.

न्यायालयाने लक्ष घालावे

कचऱ्याच्या भरावाने सखल भाग बुजवण्याच्या या प्रकाराचा लवकरच शॅडो कौन्सिल जाहीर निषेध व्यक्त करेल, असे कुतिन्हो यांनी सांगितले. मडगावात कचरा सफाईच्या नावाखाली चाललेले कारस्थान रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने स्वतः लक्ष घालून रहिवाशांना प्रदूषणापासून मुक्ती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT