Goa Latest News
Goa Latest NewsDainik Gomantak

Goa Latest News: रावणफोंड मिलिटरी कॅम्पजवळ घर आणि दुकानांना आग

Goa Latest News: शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, चारचाकीसह दुचाक्यांचे नुकसान
Published on

Goa Latest News: रावणफोंड मिलिटरी कॅम्पजवळ आज सकाळी एका घराला आणि त्याखाली असलेल्या दुकानांना आग लागून सुमारे 70 लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि पाच वाहनांची हानी झाली. मात्र, जीवितहानी टळली. या दुर्घटनेत दोन्ही आई व मुलगी बजावली.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना उघडकीस आली. मिलिटरी कॅम्पजवळ असलेल्या घराला आग लागल्याची वार्ता सगळीकडे पसरल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

ही दुमजली इमारत असून वरच्या भागात घरमालक राहातात, तर खाली तीन दुकाने आहेत. त्यातील एक सोफा तयार करण्याचे दुकान आहे. या आगीमुळे दुकानातील साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

तर इतर दोन दुकानांना थोडी-फार झळ बसली. या घराच्या बाहेर एक कार आणि तीन दुचाकी पार्क उभ्या केल्या होत्या. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे घर सेरा रॉड्रिग्स यांच्या मालकीचे असून कालच तो घराबाहेर पडला होता. त्याच्या घराच्या बाजूला त्याचा भाऊ रेमेडियस रॉड्रिग्स राहतो.

आग लागल्यावर घरातील दोन व्यक्ती लगेच बाहेर आल्यामुळे मनुष्यहानी टळली. मात्र, या घराच्या मागे असलेल्या अन्य एका घरातील महिलेला हे आगीचे लोट पाहून धक्का बसला आणि तिची प्रकृती खालावल्याने तिला इस्पितळात दाखल करावे लागले.

Goa Latest News
Girish Chodankar-Amit Patkar: काँग्रेसमध्ये पडद्याआड गटबाजी..!

दुकानात सोफा तयार करण्याचे सामान प्रमाणात आणून ठेवले होते. सोफ्याला लागणारा फोम, कुशन करण्यासाठी लागणारे कापड आणि अन्य मालाचा समावेश होता. या सर्व वस्तूंनी पेट घेतल्याने ही आग भडकली. आपण जवळपास 60 ते 70 लाखांचा माल दुकानात ठेवला होता. तो सर्व जळून खाक झाला, अशी माहिती दुकानमालकांनी दिली .

...अन् अनर्थ टळला

घरात एक वृध्द महिला आणि तिची मुलगी होती. मुलीने आईला आगीतून बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुमारे तासभर आगीशी सामना करीत अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख धीरज देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com