Margao Fish Market Gomantak Digital Team
गोवा

Margao Fish Market: अखेर निर्णय झाला! किरकोळ मासे विक्रेत्यांना घाऊक मार्केटमध्ये मनाईच

Margao Fish Market: मडगावात पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Fish Market: मडगावातील घाऊक मासळी मार्केटविषयी सध्या जो वाद सुरू आहे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज संध्याकाळी ‘एसजीपीडीए’ची बैठक झाली.

यात गोमंतकीय पारंपरिक मच्छीमार, रापणकारांना घाऊक मासळी मार्केटमध्ये केव्हाही प्रवेश देऊन मासळी घाऊक पद्धतीने विकण्यास मुभा दिली आहे. मात्र, या मार्केटमध्ये किरकोळ मासळी विक्रीस पूर्णत: मनाई केली आहे.

बैठकीनंतर ‘एसजीपीडीए’चे अध्यक्ष तथा वास्कोचे आमदार दाजी साळकर म्हणाले की, यापुढे मार्केटमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल. येथील थर्माकॉलच्या पेट्या काढून परिसर स्वच्छ केला आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. त्यामुळे अस्वच्छता कोण करतो, ते समजेल.

यापुढे गोमंतकीय पारंपरिक मच्छीमारांसाठी सकाळी दहा वाजल्यानंतरसुद्धा घाऊक मासळी मार्केट खुले ठेवण्यात येईल. मात्र, तेथे केवळ घाऊक विक्री करता येईल.

या बैठकीला मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस उपस्थित होते. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले.

माझ्या मतदारसंघात पूर्वीपासूनच घाऊक मार्केटला विरोध होता. हे मार्केट इतरत्र कुठेही हलविले तरी चालेल. मात्र, फातोर्ड्यात या मार्केटसाठी पर्यायी जागा नाही. सध्या जागेचा जो घोळ सुरू आहे, तो आणखी काही दिवस सुरूच राहील. कारण घाऊक मार्केटमधील दोन तृतियांश जागा इमारतीसाठी गेली असून एक तृतियांश जागा उपलब्ध आहे.
विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा
आजच्या बैठकीत जो निर्णय घेतला, तो समाधानकारक आहे. स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. घाऊक मार्केटसमोरील रस्त्यावर वाहने उभी करण्यास पूर्णत: मनाई आहे. उद्यापासून येथे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शिवाय या रस्त्याची दुरुस्ती व सौंदर्यीकरणही करण्यात येईल.
वेन्झी व्हिएगस, आमदार, बाणावली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: गाढ वाचेने करू गाढवाचे गुणगान!

Students Stress: न झेपणारे उच्च शिक्षण मुलांवर लादले जातेय का? बुद्धीने ‘कुशाग्र’ असणारी युवापिढी मनाने कमकुवत झाली आहे का?

Goa–London Flight: गोवा-लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार! गोमंतकीयांसाठी खुशखबर; Air Indiaची मिळणार सेवा

Goa: स्‍वदेशी वस्‍तूंना प्राधान्‍य द्या, देश बळकटीत सहभागी व्‍हा! पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन

Asia Cup 2025: शुभमन गिल, अय्यरचे काय करायचे? निवड समितीसमोर प्रश्न; जयस्वालबाबतही करावा लागणार विचार

SCROLL FOR NEXT