FDA Raid Dainik Gomantak
गोवा

Goa FDA Raid: मडगाव परिसरात 'FDA'ची कारवाई; 65 हजारांची मिठाई जप्त

Goa FDA Raid: विनापरवाना मिठाई व फरसाण तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अचानक छापे टाकून कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Goa FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अस्वच्छ वातावरणात नियमांचे पालन न करता तसेच विनापरवाना मिठाई व फरसाण तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अचानक छापे टाकून कारवाई केली.

मडगाव, नुवे, आकें, बोर्डा, कुंकळ्ळी या भागांमध्ये केलेल्या कारवाईत 65 हजार रुपये किमतीची मिठाई व फरसाण जप्त केल्याची माहिती खात्यातर्फे देण्यात आली. यंदाच्या दिवाळीत लोकांना सुरक्षित मिठाई व फरसाण उपलब्ध व्हावे यासाठी ही कारवाई करण्यात आली.

ही मिठाईची दुकाने एफडीएच्या परवान्याविना अस्वच्छ वातावरणात चालविण्यात येत होती, असे खात्याच्या पत्रकात नमूद केले आहे. त्या दुकानांना नोटिसा बजावण्यात आल्या असून दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या मोहिमा सर्व तालुक्यांमध्ये सुरू असून मावा आणि अन्य मिठाईवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.

14 व 15 ऑक्टोबर रोजी पाहणी करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये ललिता स्वीटस्‌, नुवें, बंगलोर अय्यंगार केक हाऊस, आर्लेम सर्कल, केक पॅलेस, बोर्डा, श्रीसाईराम हॉट चिप्स, आकें, जय अंबे स्वीट मार्ट, कुंकळ्ळी, विनायक बेकरी, कुंकळ्ळी, चंदन स्वीट मार्ट, आकें, राम स्वीट अँड फरसाण, कुंकळ्ळी, गुरुकृपा स्वीट अँड फरसाण, कुंकळ्ळी, सोळंकी स्वीटस्‌, कुंकळ्ळी तसेच तानाजी फरसाण, मडगाव यांच्याकडील फरसाणचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT