Abhinav Tejrana Dainik Gomantak
गोवा

C. K. Nayudu Cup: आंध्रचा गोव्यावर विजय; अभिनवचे झुंजार दीडशतक व्यर्थ

C. K. Nayudu Cup Cricket Tournament: गोव्याचा दुसरा डाव 327 धावांत आटोपला.

किशोर पेटकर

C. K. Nayudu Cup Cricket Tournament: सलामीच्या अभिनव तेजराणा याने झुंजार दीडशतक नोंदविले, पण गोव्याचा संघ कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ड गटात पराभव टाळू शकला नाही.

आंध्रने सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी बुधवारी डाव व 53 धावांनी विजय नोंदवून बोनससह सात गुणांची कमाई केली.

कडापा येथील वायएस राजा रेड्डी आंध्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या लढतीत फॉलोऑननंतर गोव्याचा दुसरा डाव 327 धावांत आटोपला.

अभिनव याने जिगरबाज फलंदाजी करताना 241 चेंडूंत 15 चौकार व सात षटकारांच्या मदतीने 158 धावा केल्या.

तो सातव्या गड्याच्या रुपात बाद झाल्यानंतर गोव्याने बाकी तीन विकेट 10 धावांत गमावल्यामुळे आंध्रच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

यजमान संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलताना वासू याने दुसऱ्या डावात 97 धावांत 6 गडी टिपले. गोव्याचा पुढील सामना 14 जानेवारीपासून भिलाई येथे छत्तीसगडविरुद्ध खेळला जाईल.

पराभव टाळण्याचे प्रयत्न अपुरे

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेरच्या 1 बाद 61 वरून गोव्याने बुधवारी सकाळी पुढे खेळण्यास सुरवात केली. अभिनवच्या दोन महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे गोव्याला पराभव टाळण्याची शक्यता दिसू लागली.

तो एका टोकाला टिच्चून फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने आंध्रने गोव्याचे फलंदाज नियमित अंतराने बाद केले. अभिनवने कर्णधार राहुल मेहता (44) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली, नंतर कौशल हट्टंगडी (22) याच्यासमवेत त्याने सहाव्या विकेटसाठी 81 धावांची भर टाकली.

शिवेंद्र भुजबळ (14) याच्यासमवेत अभिनवने सातव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केल्यानंतर त्रिपूर्ण विजय याने अभिनवला पायचीत केले आणि गोव्याचा पराभव निश्चित झाला.

संक्षिप्त धावफलक

आंध्र, पहिला डाव ः ४ बाद ६०६ घोषित

गोवा, पहिला डाव ः सर्वबाद २२६

गोवा, दुसरा डाव (१ बाद ६१ वरून) ः ९८.२ षटकांत सर्वबाद ३२७ (अभिनव तेजराणा १५८, मनीष काकोडे ४, राहुल मेहता ४४, योगेश कवठणकर ३, आयुष वेर्लेकर २५, कौशल हट्टंगडी २२, शिवेंद्र भुजबळ १४, दीप कसवणकर २, लखमेश पावणे १, शुभम तारी नाबाद १, वासू ६-९७, त्रिपूर्ण विजय २-१२०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

SCROLL FOR NEXT