
Goa Crime Case: सरकारमध्ये आपले हाय प्रोफाइल लोकांशी संपर्क आहेत. त्यामुळे मी तुमच्या भाच्याला नोकरी लावून देतो असे सांगून लाखो रुपये उकळणाऱ्या एकाला अटक करण्यात कोलवाळ पोलिसांना यश आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार अमर मांद्रेकर (रा.पर्ये, सत्तरी) याने कांदोळकर नामक व्यक्तीला तिच्या भाच्याला नोकरीला लावतो असे सांगून तिच्याकडून रुपये 3 लाख घेतले.
मात्र काही दिवस झाल्यावर मांद्रेकर हा आपले काम करत नसून घेतलेले पैसेही परत करत नसल्याचे कांदोळकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी 8 डिसेंबरला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
आपल्या विरोधात कोलवाळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाल्याचे कळताच अमर मांद्रेकर फरार झाला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कपणामुळे आज म्हणजेच बुधवारी (10 जानेवारीला) त्याला पकडण्यात कोलवाळ पोलिसांना यश आलंय.
पोलिसांनी त्याच्यावर IPC कलम 419, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केलीय. म्हापसा पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी आणि एसपी उत्तर निधी वलसन यांच्या देखरेखीखाली पीएसआय भरत खरात हे या घटनेचा तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.