Wild Boar Dainik Gomantak
गोवा

Canacona News: रानडुकराची चालत्या दुचाकीला धडक, बाप-लेक झाले जखमी; मात्र पुन्हा ते रानडुक्कर फिरुन...

Canacona News: मुलावर काणकोण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मडगाव येथे पाठवले आहे.

Ganeshprasad Gogate

Bike rider injured with wild boar रानडुकरांने केलेल्या हल्ल्यात बाप लेक जखमी झाल्याची घटना काणकोण खालवडे येथे घडलीय. तसेच या दोघांना वाचवण्यासाठी आलेल्या तिसऱ्या व्यक्तीवरही या रानडुकराने हल्ला केलाय.

या घटनेतील मुलावर काणकोण इस्पितळात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेसंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिलीप गावकर हे मुलाला घेऊन खालवडे येथील शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला रस्त्यानजीकच्या रानातून येणाऱ्या रानडुकराने धडक दिली.

ही धडक एवढी जबर होती कि या धडकेत दुचाकी चालक दिलीप व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा वियांश गावकर हे दुचाकीवरुन खाली पडले.

ही घटना समोरून दुचाकीवरून येणाऱ्या अनिल नाईक यांनी पाहिली आणि त्यांनी गावकर पितापुत्राला सावरण्यासाठी धाव घेतली.

यावेळी त्याच रानडुकराने वळून येऊन अनिल नाईक यांच्यावर हल्ला करुन त्यांना खाली पाडले. य घटनेत गावकर पितापुत्रांसह नाईक हे तिघेही जखमी झाले.

जखमी झालेल्या वियांश गावकर या मुलाला मुलावर काणकोण इस्पितळात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मडगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तर दिलीप गावकर आणि अनिल नाईक याच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Bajrang Dal Goa: 'ईद दिवशी जुलूसला परवानगी नको, कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार नाही'! बजरंग दलाचा इशारा

SCROLL FOR NEXT