Margao News : अभियंते महेंद्र काकुले यांच्‍या कवितासंग्रहाचे आज प्रकाशन

Margao News : अभियांत्रिकी क्षेत्रातील कवी मनाचे अन्‍य एक सहकारी श्रीधर कामत यांच्‍या सान्निध्‍यात वावरताना आपल्‍यातील कवी जागा झाला.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News : मडगाव, कवी मनाचे अभियंते अशी ओळख असलेले मडगावातील प्रसिद्ध असे सिव्‍हील अभियंते आणि व्‍हॅल्‍युअर महेंद्र काकुले यांच्‍या ‘थ्रेडेड म्‍युझिंग्‍स’ या इंग्रजी कवितासंग्रहाचे शुक्रवार, १२ रोजी मडगावात ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेते दामोदर मावजाे यांच्‍या हस्‍ते प्रकाशन होणार आहे.

हा सोहळा हॉटेल नानूटेलमध्‍ये सायंकाळी ६ वाजता होणार असून एस.एस. धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत हे यावेळी खास निमंत्रित म्‍हणून उपस्‍थित राहणार आहेत. काकुले यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. हा संग्रह क्‍युरेट बुक्‍स या संस्‍थेने प्रकाशित केला असून त्‍यात ४६ कवितांचा समावेश आहे.

महेंद्र काकुले यांचा ‘लेट ब्‍ल्‍यूम्‍स’ हा कवितासंग्रह यापूर्वी प्रसिद्ध झाला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील कवी मनाचे अन्‍य एक सहकारी श्रीधर कामत यांच्‍या सान्निध्‍यात वावरताना आपल्‍यातील कवी जागा झाला.

Margao
Goa Crime - घरमालकाच्या मुलाला खोलीत कोंडून तळे - दुर्गाभट फोंडा येथे चोरी | Gomantak TV

मी माझा पहिला कवितासंग्रह वयाची ५० वर्षे उलटल्‍यावर प्रसिद्ध केला. त्‍यामुळे त्‍याचे नाव ‘लेट ब्‍ल्‍यूम्‍स’ असे ठेवण्‍यात आले, असे काकुले यांनी सांगितले.

काकुले यांचे ‘प्रॉपर्टी व्‍हॅल्‍युएशन बाय इन्‍कम ॲप्राेच’ हे व्‍हॅल्‍युएशनसंदर्भातील तांत्रिक विषयावरील आणखी एक पुस्‍तक प्रसिद्ध झाले असून अभियांत्रिकी क्षेत्रात या पुस्‍तकाने आपले स्‍वत:चे असे एक स्‍थान प्राप्‍त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Margao platform fight incident
Goa political leaders clash over development projects
Margao Municipal Council Garbage Tender Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com