Miramar Beach:  Dainik Gomantak
गोवा

Miramar Beach: आगोंद, गालजीबाग, मोरजीनंतर आता मिरामार समुद्रकिनारीही ऑलिव्ह रिडलेची 90 अंडी

Miramar Beach: मोरजी टीमने मिरामार येथे पोहोचून सर्व अंडी मोरजी येथील कासवांसाठी संरक्षित केलेल्या जागी नेऊन ठेवली आहेत.

Ganeshprasad Gogate

Miramar Beach: एका ऑलिव्ह रिडले कासवाने बुधवारी रात्री 10.15 वाजता मिरामार समुद्रकिनारी सुमारे 90 अंडी घातल्याची माहिती मिळाली आहे. जीवरक्षकांच्या सतर्कतेनंतर वनविभागाने मोरजीच्या विशेष टीमने घटनास्थळी पाचारण केले.

मोरजी टीमने मिरामार येथे पोहोचून सर्व अंडी मोरजी येथील कासवांसाठी संरक्षित केलेल्या जागी नेऊन ठेवली आहेत. समुद्री अभ्यासक आणि जीव शास्त्रज्ञ तसेच प्राणी मित्रांसाठी ही आनंदची बाब समजले जातेय.

तसं बघितलं तर सागरी कासव स्वच्छ समुद्र राखून समृद्धी पर्यावरणाचा समतोल राखत असतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळलेल्या आहेत, त्यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार भारतात आढळून येतात,

कासव हा बुजरा जीव असून त्यांच्यासाठी किनाऱ्यावर शांतता महत्त्वाची असते. त्यामुळे कासवांची संरक्षित केलेल्या किनाऱ्यांवर प्रशासनाने सायंकाळी 7 वा. नंतर कसल्याच प्रकारचे दिवे प्रज्वलित करण्यास निर्बंध घातले आहेत.

तसेच नियमानुसार शॅक व्यावसायिकांना सायं. 7 वा. नंतर कसल्याच प्रकारचे दिवे लावण्यास करण्यास मनाई आहे. मात्र, काही रेस्टॉरंट, क्लब यांनी मोठ्या प्रमाणात प्रखर दिवे, हॉटेल्सवर विद्युत रोषणाई केली जात असल्याचे दिसून आलेय.

सागरी कासव ज्या ठिकाणी अंडी घालण्यासाठी येतात, त्या ठिकाणी मऊ वाळूमध्ये ती खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यांमध्ये अंडी घातल्यानंतर पुन्हा समुद्रात जातात. अशावेळी तिथे सुरक्षितता असणं महत्वाचं आहे.

गोव्यात मोरजी पंचायत क्षेत्रातील तेंबवाडा समुद्रकिनारी भागात कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ सालात एकूण 69 सागरी कासवांनी 5,703 अंडी घातली होती. त्यातून 3,842 पिल्लांना वन्य विभागाने सुखरूपरित्या समुद्रात सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT