Suchana Seth: सूचना सेठ मित्रांना सांगायची, ''त्याच्या पप्पासारखाच दिसायचा मुलगा''

Bangalore CEO Suchana Seth: गोव्यात मागील दोन दिवसांपासून एक खून प्रकरण चांगलचं गाजत आहे.
Suchana Seth
Suchana SethDainik Gomantak
Published on
Updated on

Bangalore CEO Suchana Seth: गोव्यात मागील दोन दिवसांपासून एक खून प्रकरण चांगलचं गाजत आहे. आपल्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या करणारी खुनी आई सूचना सेठ हिच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गोव्यातील एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलाची हत्या करण्यापूर्वी, सूचनाने त्याला झोपण्यासाठी खोकल्याचे सिरप दिले आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सूचना तिचा पती व्यंकटरमण याचा खूप तिरस्कार करत होती. या द्वेषाने तिला खुनी बनवले. बंगळुरुमधील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठने अनेकदा तिच्या मित्रांना सांगितले होते की, तिच्या मुलाचा चेहरा त्याच्या वडिलांसारखा दिसतो, त्याचं रुपडं तिला वारंवार व्यंकटरमनची आठवण करुन देत होतं.

दरम्यान, गोव्यातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सूचना सेठने तिच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते की, तिचा मुलगा तिचा पती व्यंकटरमणसारखा दिसतो. त्याचा चेहरा तिला नेहमी त्यांच्या तुटलेल्या नात्याची आठवण करुन देत असे. या खळबळजनक हत्याकांडाचा पोलिस तपास अधिक खोलवर गेल्याने रमणने सूचनाला फोन करुन आपल्याला आपल्या मुलाला भेटायचे आहे, असे सांगितल्याचेही समोर आले आहे. व्यंकटरमणला भेटण्याची परवानगीही न्यायालयाकडून मिळाली होती. तो आठवड्यातून एकदा आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो.

Suchana Seth
Suchana Seth CEO: लाखो रुपयांच्या पोटगीसाठी आईने घेतला लेकाचा जीव; नवऱ्याची भेट होऊ नये म्हणून आली होती गोव्यात

व्यंकटने आपल्या मुलाला घरी आणण्यास सांगितले होते

पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, व्यंकटरमनने रविवारी सूचनाला आपल्या मुलाला बंगळुरुला घेवून येण्यास सांगितले होते. मात्र, सूचनाने व्यंकटरमनची विनंती धुडकावून लावली आणि त्याला शहरातील एका ठिकाणी भेटण्यास सांगितले. दोन तासांहून अधिक वेळ रमणने सांगितलेल्या ठिकाणी सूचनाची वाट पाहिली मात्र ती न आल्याने तिला त्याने अनेक वेळा फोन केला. मात्र, तिने त्याच्या कॉल, मेसेज आणि ईमेललाही प्रतिसाद दिला नाही.

यानंतर मात्र, व्यंकटरमण कामानिमित्त इंडोनेशियाला गेला. नंतर त्याला समजले की, सूचना मुलाची त्याच्याबरोबर भेट होऊ नये म्हणून गोव्याला गेली आहे. दुसरीकडे, सूचनाच्या मुलाचा मृतदेह बुधवारी चित्रदुर्गहून बंगळुरुला आणण्यात आला. त्यानंतर राजाजी नगर येथे मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सूचनाला सोमवारी रात्री चित्रदुर्ग येथे गोव्याहून बंगळुरुला जात असताना पकडण्यात आले. यादरम्यान तिने आपल्या मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये लपवून ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com