Purple Fest In Goa Dainik Gomantak
गोवा

International Purple Fest 2024 साठी गोवा सज्ज; 'धमाल' हे पर्पलगीत ठरणार उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य

International Purple Fest 2024: खास दिव्यांगजनांसाठी पर्पल टीव्ही भारतचे अनावरण या महोत्सवात केले जाणार आहे.

Ganeshprasad Gogate

International Purple Fest 2024: सोमावर (ता. 8) पासून 13 जानेवारीपर्यंत संपूर्ण आठवडाभर आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट- गोवा 2024 चे आयोजन करण्यासाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे.

गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय, भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोमवार (ता. ८) रोजी सायंकाळी ४.३० वाजता काम्पाल-पणजी येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणार आहे.

उद्घाटन समारंभासाठी मान्यवर पाहुण्यांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती असेल.

तसेच विशेष निमंत्रितांमध्ये गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे, केंद्रीय पर्यटन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाला गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई, राज्यसभा सदस्य श्री. सदानंद तानावडे, गोवा शासनाचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल (आयएएस), गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हझिक आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'धमाल' हे पर्पलगीत होय. या पर्पल फेस्ट गीताचे वैशिष्ट्य म्हणजे गोव्यातील दिव्यांग व्यक्तींनी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज हस्तींच्या समवेत हे गीतगायन व सादरीकरण केले आहे.

तसेच खास दिव्यांगजनांसाठी पर्पल टीव्ही भारतचे अनावरण या महोत्सवात केले जाणार आहे. या टीव्ही चॅनेलवर दिव्यांगजनांच्या कल्पना, यशोगाथा, मुलाखती आणि जगभरातील त्यांच्या यशोगाथा सादर करत, त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक प्रसारमाध्यम व्यासपीठ उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.

इंटरनॅशनल पर्पल फेस्टमध्ये जगभरातून 8000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याचा अंदाज आहे. एकूणच हा महोत्सव वैविध्यता आणि सर्वसमावेशकता यांचा हा जागतिक सोहळा ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT