Purple Fest Goa: अंतर आणि दिव्यंगत्वावर मात करत मुंबईच्या सायकलपटूंचे टँडम सायकलवरुन गोव्यात आगमन!

Purple Fest Goa मुंबई ते गोवा प्रवास: आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट- गोवा 2024 मध्ये सहभागासाठी आव्हानांवर मात
Purple Fest Goa:
Purple Fest Goa:Dainik Gomantak
Published on
Updated on

Purple Fest Goa:- बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी 40 तासांच्या उल्लेखनीय प्रवासादरम्यान अंतर आणि दिव्यंगत्वावर मात करत सहा साहसी सायकलपटूंच्या गटाने तीन टॅंडम सायकलवरून मुंबई ते गोवा असा यशस्वी प्रवास केला.

रविवारी सकाळी काम्पाल-पणजी येथील दयानंद बांदोडकर मैदानावर आगमन झाल्यानंतर, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी त्यांची भेट घेतली.

समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई म्हणाले, “टॅन्डम सायकलवरून प्रवास करत हे तरुण गोव्यात दाखल झाल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे. ताशी 20-25 किलोमीटर या सरासरी गतीने त्यांनी हा प्रवास केला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने एका उद्दात उपक्रमात सहभागी होण्यासाठी हे तरुण गोव्यात आले आहेत.”

Purple Fest Goa:
Gramsabha: म्हाऊस पंचायतीच्या ग्रामसभेत टाॅवरचा मुद्दा गाजला; पर्यटन खात्याच्या 'या' योजनेबाबतची चर्चाही रंगली

या धाडसी गटाने टँडम सायकलच्या मर्यादांवर मात करत एक आव्हानात्मक परंतु गौरवशाली असे काम केले आहे. त्यांच्या मनामध्ये असलेली ऊर्मी, जिद्द, दृढ निश्चय या गुणांनी लांब अंतर, खडतर प्रवासादरम्यानचा शारिरीक थकवा आणि शारिरिक मर्यादा या बाबींवर मात केली आहे.

दिव्यांग व्यक्तींना अक्षम असे लेबल लावणे योग्य नाही. हे एक आव्हान आहे यात शंका नाही, पण आम्हाला त्यावर मात करायची आहे, त्याला सामोरे जायचे आहे आणि आनंद घ्यायचा आहे, असे यातीलच एक सायकलपटू नुपूर पिट्टी हिने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com