Suchana Seth Dainik Gomantak
गोवा

Candolim Murder Case: महत्वाची बातमी! सूचना सेठने लिहिलेली चिठ्ठी सापडली; त्यात नमूद केलंय की, मुलाला...

Suchana Seth CEO: 5 ते 6 ओळींमध्ये इंग्लिशमध्ये ही नोट लिहिली असून तिच्या लिखाणावरून ती मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे उघड होतंय.

Ganeshprasad Gogate

Suchana Seth CEO: सिकेरीतील हॉटेलमध्ये आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या करणारी संशयित म्हंणून ताब्यात घेतलेली त्या मुलाची आई सूचना सेठ हिच्याबाबत आणि एकंदरीतच या प्रकरणाबाबत दिवसागणिक नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. नुकतीच या प्रकरणाबाबत एक नवीन माहिती समोर येतेय.

सूचना सेठ हिच्या सामानाच्या बॅगेत आयलाइनरमध्ये टिशू पेपरवर लिहिलेली चुरगळलेल्या आणि फाडलेल्या अवस्थेतील एक नोट कळंगुट पोलिसांना मिळाली आहे. 5 ते 6 ओळींमध्ये इंग्लिशमध्ये ही नोट लिहिली असून तिच्या लिखाणावरून ती मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे उघड होतंय.

त्यावरील मजकुरातून हे स्पष्ट होतेय की, सूचनाला आपल्या मुलाला वडिलांच्या ताब्यात देण्याची इच्छा नव्हती. तसेच तिने त्यात पती तिचा छळ करत असल्याचेही नमूद केले आहे.

पोलिसांनी तिच्या हस्ताक्षराचा पंचनामा घेतला आहे. तसेच मेडिकल चाचणी केली आहे. गुन्ह्यावेळी वापरलेले उशी, टॉवेल, बॅग, ती वाचत असलेली काल्पनिक कथांची पुस्तकं असे सर्व साहित्यही ताब्यात घेतले आहे.

दरम्यान तिच्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहिती नुसार सूचनाचे तिच्या मुलावर प्रेम होते. तिच्या मुलाचा चेहरा त्याच्या वडिलांसारखा दिसायचा.

त्यामुळे आपल्या मुलाचा चेहरा तिच्या नवऱ्याची म्हणजेच व्यंकटरमनची आठवण करुन देतो असेही तिने अनेक वेळा आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. तसेच ती डिसेंबरमध्ये मुलासोबत सुट्टीसाठी गोव्यात आली असल्याची ही माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT