4 वर्षीय बाळाचा मृतदेह, संशयित आई आणि 12 तासांचा गोवा ते चित्रदुर्ग प्रवास; टॅक्सी चालकाने सांगितला तो थरारक अनुभव

टॅक्सी चालकाच्या मदतीने 4 वर्षीय मुलाच्या खूनाचा आरोप असलेल्या आईला अटक करण्यास कशी मदत झाली?
Experience of Taxi driver Who Drove CEO Suchana Seth
Experience of Taxi driver Who Drove CEO Suchana SethDainik Gomantak

Experience of Taxi driver Who Drove CEO Suchana Seth to Chitradurg

"रात्री साडे बाराची वेळ होती, सिकेरीतील एका हॉटेलमधून फोन आला. एका प्रवाशाला तातडीने बंगळुरू येथे सोडायचे असून, लवकरात लवकर कॅब घेऊन या. सुमारे 550 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याने प्रवासाला किमान 12 तास लागणार होता," असे मुलाच्या खूनाचा आरोप असलेल्या आईला घेऊन जाणारा टॅक्सी ड्रॅव्हर रेजॉन डिसुझा सांगत होता.

रात्री एक वाजण्याच्या सुमारास सूचना सेठ गाडीत बसल्या. 'माझी बॅग घेऊन ये,' असे तिने सांगितले. हॉटेलच्या रिसेप्शनवरून मी एक काळी बॅग उचलली.

मी बॅग घेऊन आलो तेव्हा ती खूप जड वाटत होती. बॅग एवढी जड का आहे? त्यात दारूच्या बाटल्या आहेत का? असे मी विचारले. पण त्यावेळी फारशी शंका आली नाही किंवा त्यात चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह असेल याची देखील कल्पना नव्हती. मी बॅग गाडीत ठेवून बसलो आणि बंगळुरुला जाण्यासाठी आमचा प्रवास सुरु झाला.

संपूर्ण प्रवासात सूचना एकदम शांत होती. आम्ही गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर पोहोचलो तेव्हा तिथे संपूर्ण रस्ता जाम झाला होता. तिथे असलेल्या पोलिसांना 'सर, किती वेळ लागेल?' असे विचारले. पोलीस कर्मचाऱ्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुमारे 4 तास लागतील, असे सांगितले.

मी परत गाडीत आलो आणि मॅडमला दोन तास वाढवून सांगून 5-6 तास लागतील, असे सांगितले. 'तुमची म्हणाल तर, मी यू टर्न घेऊन तुम्हाला विमानतळावर सोडतो. तेथून तुम्ही फ्लाइट बुक करू शकता. पण सूचनाने नकार दिला आणि वाहतूक सुरळीत झाल्यावर जाऊ. काही अडचण नाही,' असे म्हणाली.

एकीकडे तिला बंगळुरुला जायची घाई होती. दुसरीकडे ट्रॅफिक जाम असूनही तिला काही अडचण नसल्याचे म्हणत होती, त्यामुळे मला थोडं विचित्र वाटलं.

कर्नाटक सीमा ओलांडल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास मला गोवा पोलिसांचा फोन आला. त्यांच्याकडून रात्री हॉटेलमधून महिलेला घेऊन गेल्याचे विचारण्यात आले. महिलेसोबत मुलगा आहे का? असे विचारल्यावर मी नाही बोललो.

Experience of Taxi driver Who Drove CEO Suchana Seth
रुममध्ये रक्ताचे डाग, टॅक्सी चालकाची सतर्कता, पोलिसांचा मागोवा; कांदोळी खून प्रकरणाची ए टू झेड कहाणी

त्यावर मी काय झाले? असे विचारल्यावर ती राहत असलेल्या हॉटेलच्या खोलीत रक्त आढळल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्यानंतर मी सूचनाकडे फोन दिला पोलिसांनी तिच्याशी संवाद साधला आणि तिने पोलिसांना एक पत्ता आणि एक नंबर देखील दिला.

पोलिसांनी नंतर हा पत्ता आणि नंबर कन्फर्म करुन पुन्हा तुला कॉल करतो असे सांगितले. त्यानंतर एक तासाने फोन आला आणि पोलिसांनी, 'तिने दिलेली माहिती खोटी असल्याचे आढळून आले आहे. आणि तिने काहीतरी केल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे तू जवळच्या पोलीस स्टेशनला गाडी घेऊन जा असे सांगितले.'

यावेळी आमचा संवाद कोकणीतून सुरु होता, त्यामुळे सूचनाला काय सुरु आहे ते कळत नसल्याचे ड्रायव्हर म्हणाला.

तोपर्यंत आम्ही हुबली सोडून पुढे आलो होतो, मार्गावरचे सर्व बोर्ड कन्नड होतो, रस्ता समासूम होता. मोबाईलवर जवळचे पोलीस स्टेशन शोधले असता ते 100 किलोमीटर मागे दाखवत होते. यु-टर्न घेऊन पुन्हा मागे जावे तर सूचनाला संशय येईल त्यामुळे काय करावे समजत नव्हते.

टोल नाक्यावर पोलीस मिळतील अशी अपेक्षा होती पण दोन टोल नाके गेले तरी पोलीस दिसले नाहीत.

माझ्यासोबत असलेल्या ड्रायव्हरला मी गाडी एका रेस्टॉरंटमध्ये थांबवतो. तू एक काम कर, वॉश रूममध्ये जा आणि दहा मिनिटे तिथेच थांब. त्यानंतर मी तिथेच असलेल्या एका गार्डला येथे जवळचे पोलीस स्टेशन कोठे आहे? विचारले, त्यावर त्याने 500 मीटर अंतरावरच आयमंगला पोलीस स्टेशन असल्याचे सांगितले. त्यानंतर मी ड्रायव्हरला बोलवून घेतले आणि आम्ही पोलीस स्टेशन गाठले.

पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी गाडीतील बॅग तपासून पाहिली तर त्यात चार वर्षीय बाळाचा मृतदेह आढळून आला. बॅगमध्ये कपड्याखाली तिने मुलाचा मृतदेह ठेवला होता. सूचना प्रवासात सूचना एकदम शांत होती, असे ड्रायव्हर सांगत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com