Minister Gawde Dainik Gomantak
गोवा

Goa News: राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडू नका- मंत्री गावडे; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Marathi News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर घडामोडी

Akshata Chhatre

राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडू नका - मंत्री गावडे

वेरे वाघुर्मे पंचायत क्षेत्रातील खेडे गावात ३३ वीज खांब उभारुन पथदीपांचे मंत्री गोविंद गावडेंकडून उद्घाटन. पंचायत क्षेत्रातील काही भागातील पाण्याची समस्या एनओसींमुळे रखडली असल्याची मंत्री गावडेंची माहिती. राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहान मंत्री गावडेंनी केले.

Goa Accident: तिळारी‌ मोर्ले गावात वन्य हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

तिळारी खोऱ्यातील मोर्ले गावात वन्य हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण गवस (७० वर्षे) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू. काजू बागायतीत गेले असता घडली दुर्देवी घटना.

Bondla Zoo: "वनमंत्री म्हणून प्राणीसंग्रहालय बंद करण्याबद्दल अधिकाऱ्याने मला माहिती दिली नव्हती."

Goa News Marathi: साल्वादोर द मुंद येथे विहिरीत पडलेल्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान

Viresh Borkar Goa: बांबोळी मिलिटरी कॅम्पच्या बाजूलाच बेकायदेशीर वस्ती पडण्याची गरज

बांबोळी मिलिटरी कॅम्पच्या बाजूलाच बेकायदेशीर वस्ती गेल्या काही वर्षांपासून वास्तवात आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे याची लेखी तक्रार करून सुद्धा अजूनही काहीच हालचाल केली नाही. आमदार या नात्याने केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेतली जात नाही याचाच अर्थ सरकारचा या वस्तीला पाठिंबा आहे. आता उच्च न्यायालयाने सुद्धा घालून दिलेल्या ८ प्रकारांमध्ये ही वस्ती येते. तेव्हा आतातरी ही वस्ती पाडणं जरूरी आहे असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

Goa News: प्रकाश भिवशेट होणार म्हापसा नगरपरिषदेचे नवे उपाध्यक्ष

प्रकाश भिवशेट हे म्हापसा नगरपरिषदेचे नवे उपाध्यक्ष होणार आहेत. या पदासाठी ते एकमेव उमेदवार होते, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Goa Crime: मोपा गावात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ; रात्री पोलीस टेहाळणी वाढवण्याची मागणी

मोपा गावात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मोपा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत रात्री पोलीस टेहाळणी वाढवण्याची मागणी केली आहे.

Goa News: कुंभारजुवे भाजप मंडळाची स्वच्छता मोहीम

कुंभारजुवे भाजप मंडळाकडून स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ. वेगवेगळ्या ४ गटांकडून ४ ठिकाणी मोहीम सुरू. ओल्ड गोवा गांधी सर्कलाजवळ मोहीमेत आमदार राजेश फळदेसाईंनी घेतला सहभाग.

Goa Sports: माहिम नाईक आय कॉम्पिट नॅचरल बॉडीबिल्डिंग नॅशनल-लेव्हल फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये चमकला

डिचोलीमधील येथील माहिम ज्ञानेश्वर नाईक यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या आयसीएन (आय कॉम्पिट नॅचरल) मुंबई मॅजेस्टिक ऑल इंडिया नॅशनल लेव्हल स्पर्धेत तीन पदके जिंकून गोव्याला अभिमान वाटला. अवघ्या २० वर्षांच्या वयात, माहिमने पुरुषांच्या फिटनेस ओपनमध्ये पहिले स्थान पटकावले, पुरुषांच्या फिटनेस नोव्हाइसमध्ये दुसरे स्थान मिळवले आणि २३ वर्षांखालील पुरुषांच्या फिटनेस प्रकारात चौथे स्थान मिळवले. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीवरून नैसर्गिक शरीरसौष्ठव आणि फिटनेस क्षेत्रातील त्याच्या समर्पणाची आणि वाढत्या क्षमतेची झलक दिसून येते.

Goa Accident: नाल्यात पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सोमवारी संध्याकाळी दावर्ली हाऊसिंग बोर्ड येथे एक दुःखद घटना घडली. दोन वर्षांचा मुलगा खेळत असताना चुकून त्याच्या घराशेजारील नाल्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मायना-कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

Goa Accident: सोमवारी रात्री डिचोलीत कपड्यांच्या शोरूमला आग

डिचोलीत कपड्यांच्या शोरूमला आग. सोमवारी रात्रीची घटना. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. इन्व्हर्टर जळाला. कपडेही जळाले.

Goa Weather: सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड

वाळपई-सत्तरी येथे सोमवारी पडलेल्या पावसाने अनेकांचं मोठं नुकसान केलं आहे.

Goa News: कोलवाळ कारागृहात अंडरट्रायल कैद्याचा महिला कॉन्स्टेबलवर हल्ला

गेल्या वर्षी कळंगुट हॉटेलमध्ये तिच्या ४ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका अंडरट्रायल कैद्याने कोलवाळ कारागृहात एका महिला पोलिस कॉन्स्टेबलवर (एलपीसी) हल्ला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT