Goa Marathi news Dainik Gomantak
गोवा

Goa News: गॅस सिलींडरच्या गैरवापरामुळे एका मारवाडी तरुणास अज्ञांताकडून जबर मारहाण

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांकवाळ येथे धडक; एकाचा मृत्यू

सांकवाळ येथे एक भयानक अपघात घडला जिथे एका भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. टँकरखाली चिरडल्याने मागे बसलेले मधुकर परब (७०, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला. वास्को पोलिस अधिक तपास करत आहेत.

"एक पॅडल आनंदासाठी":  सायकल प्रवासातील अनुभव व पर्यावरण संदेशावर आधारित

"एक पॅडल आनंदासाठी" हे संकेत सुरेश नाईक यांचे पुस्तक सायकल प्रवासातील अनुभव व पर्यावरण संदेशावर आधारित असून, सायकलला जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन लेखकांनी केले आहे. या पुस्तकाची प्रत डॉ. माधव गाडगीळ यांना देताना लेखक संकेत सुरेश नाईक, पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर व मधु गावकर

बेतोडा-फोंडा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण; एकाला अटक

बेतोडा-फोंडा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली फोंडा पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. नंतर पीडितेचा शोध घेण्यात आला आणि तिला महाराष्ट्रातील नांदेड येथून वाचवण्यात आले.

वेर्णा येथील क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

आयडीसी वेर्णा येथील अत्याधुनिक १९१९ क्रीडा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव, कमला प्रसाद यादव, मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

धारगळ सरपंचपदी अर्जुन कानोळकर

धारगळ सरपंचपदी अर्जुन कानोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

रशियाहून येणाऱ्या हंगामातील पहिल्या चार्टर विमानाचे स्वागत करण्यासाठी गोवा सज्ज

२०२५-२६ पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान उद्या रशियातील नोवोसिबिर्स्क येथून गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाळपई येथे रक्तदान शिबिर

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाळपई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन गोवा सरकारतर्फे महिला व बालविकास संचालनालय, महिला व बालविकास विभाग (सत्तरी), सार्थक फाउंडेशन, सीएचसी वाळपई व ब्लड बँक, व्हिक्टर हॉस्पिटल – मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

बाळळी - अडणे पांचायतीवर भाजपचे वर्चस्व, काँग्रेसला झटका

बाळळी - अडणे पांचायतीवर भाजप समर्थक हर्षद परीट यांची निवड झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कुंकळळीचे माजी आमदार क्लाफास डायस, दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, नगरसेवक विदेश देसाई, पंच नविता उपेंद्र फळदेसाई व अंजू मालू वेळीप, विनोद देसाई, सुदेश भिसे, उपेंद्र फळदेसाई व प्रल्हाद शिरोडकर उपस्थित होते

आम आदमी पक्षाने वीज दरात वार्षिक ४% वाढ करण्यास  केला विरोध

आम आदमी पक्षाने वीज दरात वार्षिक ४% वाढ करण्यास विरोध केला आहे, तो अन्याय्य आणि सामान्य लोकांवर ओझे असल्याचे म्हटले आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते वाल्मिकी नाईक म्हणाले की वीज ही एक मूलभूत गरज आहे आणि ती कमी किमतीत आणि वीज कपातीशिवाय उपलब्ध झाली पाहिजे.

निरंकाल गाळवाडा येथील गेली ३५ वर्षे सरस्वतीचे पूजन

निरंकाल गाळवाडा येथील गेली ३५ वर्षे सरस्वतीचे पुजन पालक शिक्षक व ग्रामस्थ तर्फे धुमधडाक्यात पुजली जाते. आज या ठिकाणी ३ दिवस भरगच्च कार्यक्रम होत आहे

रामनगर-अणमोड रस्त्यावर अनेक वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

रामनगर-अणमोड रस्त्यावर बस, ट्रक, टेम्पो आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गॅस सिलींडरच्या गैरवापरामुळे एका मारवाडी तरुणास अज्ञांताकडून जबर मारहाण

नागवां -हडफडें पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील घटना. घरगुती वापराच्या गॅस सिलींडरच्या गैरवापरामुळे एका मारवाडी तरुणास अज्ञांताकडून जबर मारहाण. पोलिस तक्रार दाखल. तपास सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आमका नाका मोबईल टॉवर! सरकारी प्राथमिक शाळेजवळ टॉवर नकोच

Balli Sarpanch: पारोडानंतर बाळ्ळी पंचायतीवरही भाजपचे वर्चस्व, हर्षद परीट झाले सरपंच

राजस्थानी तरुणाला हडफडे येथे अज्ञाताकडून जबर मारहाण; गॅस सिलिंडर अफरातफरीचा केला होता आरोप

Dussehra 2025 Wishes In Marathi: आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेऊनी आली विजयादशमी...प्रियजनांना पाठवा दसऱ्याच्या मराठीतून शुभेच्छा

Viral Video: महिलेची हातचलाखी, ज्वेलरी शॉपमधून चोरी केला सोन्याचा महागडा नेकलेस, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT