गोवा

GoaNews: वास्कोत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, पंपिंग स्टेशन बंद, काँग्रेस नेते नंददीप राऊत यांचा सरकारला इशारा; वाचा दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर बातम्या

Akshata Chhatre

वास्कोत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर, पंपिंग स्टेशन बंद, काँग्रेस नेते नंददीप राऊत यांचा सरकारला इशारा

वास्को शहरात सांडपाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. शहरातील चार गटार पंपिंग स्टेशन्स (Sewerage Pumping Stations) गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येबद्दल काँग्रेसचे नेते नंददीप राऊत यांनी सरकार आणि संबंधित महामंडळावर (Sewerage Corporation) जोरदार टीका केली. पंपिंग स्टेशन्सचे आधुनिकीकरण (Upgrade) आणि देखभाल (Maintenance) करण्यात हे प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

'आधी मूलभूत सुविधा द्या, मग सर्क्युलर काढा', अमित पाटकरांचा सावंत सरकारवर हल्लाबोल

गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (GPCC) अध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्यातील नागरिकांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे. गोव्यातील नागरिकांची घरे आता सुरक्षित राहिलेली नाहीत आणि लोक वीज तसेच पाण्याच्या गंभीर समस्यांचा सामना करत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. पाटकर यांनी विशेषतः वीज विभागाच्या एका नवीन परिपत्रकावर (Circular) टीका केली आहे.

"गोळीबारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध सुरु" - राहुल गुप्ता

पेडणे गोळीबार घटनेबाबत एका मोठ्या अपडेटमध्ये, पोलिस अधीक्षक (उत्तर) राहुल गुप्ता यांनी पुष्टी केली आहे की गोळीबारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस गुन्हे शाखेसोबत काम करत आहेत.

पेडणे गोळीबार घटना: "कठोर कारवाई केली जाईल"- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की कठोर कारवाई केली जाईल आणि जबाबदार असलेल्यांना तुरुंगात टाकले जाईल.

सयाजी पांडुरंग सावंत यांची बिनविरोध निवड

म्हाऊस पंचायतीचा उपसरपंचपदी सयाजी पांडुरंग सावंत यांची बिनविरोध निवड.

गोवा अन्नसंस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन

विनायक विष्णू खेडेकर यांनी लिहिले पुस्तक गोवा अन्नसंस्कृती या पुस्तकाचे प्रकाशन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंत्रालय पर्वरी येथे करण्यात आले

48 पणजी स्मार्ट सिटी ईव्ही बस सेवा पुन्हा सुरू

दिवाळी बोनस न दिल्याने सकाळी ईव्ही बसचालकांनी बस सेवा बंद करण्यात आली होती. पण आता कदंब अधिकाऱ्यांनी त्यांना संध्याकाळपर्यंत बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे आता सर्व ४८ पणजी स्मार्ट सिटी ईव्ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आले आहेत

MGPच्या तिकिटावर विश्वास; एमजीपी आणि भाजपशी लढण्यास तयार : भाटीकर

फोंडा पोटनिवडणुकीसाठी एमजीपीचे तिकीट मला नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे. जर मला मिळाले नाही तर मी पक्षाचा राजीनामा देण्यास तयार आहे. जर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर मी आशियातील सर्वात मोठ्या पक्ष असलेल्या भाजपच्या ३३ आमदारांशी लढण्यास तयार आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांविरुद्ध जाण्यावरून मी पूर्णपणे तयार असल्याचे दिसून येते : डॉ. केतन भाटीकर

"मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही"

वाळपईत मराठी प्रेमींचे धरणे आंदोलन, नोकर भरतीत मराठी विषय डावलल्याप्रकरणी निषेध, मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाल्याशिवाय मराठी प्रेमी गप्प बसणार नाही.

नायबाग येथे गोळीबार; वाळू उपशाच्या वादात दोघे जखमी

पेडणे येथील नायबाग येथे वाळू उपशाच्या वादात गोळीबार होऊन दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जीएमसी येथे नेण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.

रईश मागोसच्या रहिवाशांनी पुन्हा एकदा नदीतील गाळ काढण्याचे काम थांबवले

कॅसिनो जहाज बांधण्याच्या योजनेशी त्याचा संबंध असल्याची भीती वाटत असल्याने रईश मागोसच्या रहिवाशांनी पुन्हा एकदा नदीतील गाळ काढण्याचे काम थांबवले. साळगावचे आमदार केदार नाईक यांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून कामे थांबवण्याचे आदेश दिले आणि अशा कृतींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

SCROLL FOR NEXT