Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन

Goa marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये

गोमन्तक डिजिटल टीम

सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; ८ लाखांचा ऐवज लंपास

सांकवाळ येथे फ्लॅट फोडून चोरी झाल्याची घटना नोंद झाली आहे. चोरांनी दागिने आणि महाग घड्याळे असा साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

पॅथॉलॉजिकल लॅबला आके-बायश येथे विरोध

आके बायश येथील घाटमोरोड परिसरातील एका निवासी बंगल्यात पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा सुरू करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. जर निवासी परिसरात अशी प्रयोगशाळा सुरू केली तर आरोग्याला धोकादायक ठरण्याची भीती स्‍थानिकांनी व्‍यक्त केली आहे.

डिचोलीतील युवक बुडाला

पिळगाव जेटीजवळ मांडवी नदीत डिचोलीतील युवक बुडाला. किनारी पोलिस दलाकडून शोध जारी. आत्महत्येचा संशय

5 दिवस पाऊस कायम!

येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता. राज्य हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी.

FIDE विश्वचषक 2025 चे आयोजन गोव्यासाठी एक उपलब्धी: मुख्यमंत्री

FIDE विश्वचषक २०२५ चे आयोजन हा भारत आणि गोव्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्याच्या आपल्या क्षमतेवर जागतिक विश्वास दर्शवितो. यामुळे आपल्या तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याची प्रेरणा मिळते: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पीजेएनएस येथे एएफसी चॅम्पियन्स लीग; फातोर्डा येथील रस्ते तात्पुरते बंद

२२/१०/२०२५ रोजी फातोर्डा येथील पीजेएनएस येथे होणाऱ्या एएफसी चॅम्पियन्स लीग सामन्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने तात्पुरते रस्ते बंद करण्याचे आणि वळवण्याचे आदेश जारी केले आहेत.

शुभेच्छांसाठी लावलेले फलक फाडले

डॉक्टर संजय कोरगावकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छासाठी लावलेले फलक त्याचे फाटण्यात आले. मागच्या वेळीही चतुर्थीच्या निमित्ताने असे फलक लावले होते. तेही फाटण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला.

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन

गोवा फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस दुर्गदास कामत यांनी पणजी येथील गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन केले. पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आम्ही जोपासत आलो आहोत आणि ती पुढेही कायम ठेवत आहोत, असे गोवा फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस दुर्गदास कामत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT