Mapusa Water Issue 
गोवा

Mapusa Water Issue: म्हापसा-कळंगुट महामार्ग जलमय; जलवाहिनी फुटल्याने वाहनचालकांची तारांबळ

लाखो लिटर पाणी आजूबाजूच्या भागात पसरत पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला.

Ganeshprasad Gogate

Mapusa Water Issue बोडगेश्‍वर मंदिराजवळील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामा्दरम्यान पाण्याची पाइपलाइन फुटल्याने म्हापसा-कळंगुट मार्ग अक्षरशः पाण्याखाली गेल्याचा प्रकार घडला. घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवण्यात आली.

मात्र बराच वेळ यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने महामार्गाला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. साहजिकच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची मात्र गैरसोय झाली.

शनिवारी सकाळी बोडगेश्वर मंदिराजवळील मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठा वॉशआउट निर्माण झाला होता. या घटनेत बोडगेश्वर- कळंगुट-काणका रस्ता पाण्याखाली गेला होता.

या घटनेमुळे म्हापसा परिसरातील रहिवासी आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच या मार्गावरील वाहतूक देखील काही काळ विस्कळीत झाली होती. याच परिसरात सध्या कालवा दुरुस्तीचे काम सुरु असल्याने त्याचाही त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतोय.

संबंधित घटना पीडब्ल्यूडी विभागाला कळवण्यात आली होती. मात्र खात्याकडून 'थंडा' प्रतिसाद मिळाल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली. या गोंधळामुळे लाखो लिटर पाणी आजूबाजूच्या भागात पसरत पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडल्यास त्यावर ठोस आणि जलद उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांमधून होत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT