U.S. Ambassador Eric Garcetti : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील 'नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग' (NGS) प्रयोगशाळेला भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गार्सेटी यांनी शुक्रवारी युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (USID) भारतातील अधिकारी आणि गोवा आरोग्य विभागाच्या सदस्यांसह प्रयोगशाळेला भेट दिली.
गोव्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यूएस राजदूताच्या भेटीमुळे जीनोमवर पाळत ठेवणे आणि रोगजनकांच्या शोधात राज्याची प्रगती दिसून येते. साथीचे रोग आणि स्थानिक रोगांशी लढण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण आहे, असे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.
राज्याची जलद प्रतिसाद, अत्याधुनिक सुविधा आणि एकात्मिक तंत्रज्ञान, आण्विक चाचणी प्रयोगशाळा आणि टेलिमेडिसिन यांनी कोविड-19 संकट काळात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे गोव्याचे आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.