Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुचेली मैदान वाचविण्यासाठी म्हापशासह सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार

Goa News: राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार ; कुचेली मैदानाची विक्री नको

दैनिक गोमन्तक

Goa Sports News: कुचेली मैदान वाचविण्यासाठी म्हापशासह इतर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. यात आमचे वैयक्तिक स्वार्थ नव्हते. शहरात कुचेली वगळता सध्या एकही खुले मैदान मुलांना खेळण्यासाठी नाही.

अशावेळी विकासाच्या नावाने हे मैदान भूखंड पाडून आम्ही कुणालाच विकू देणार नाही. भविष्यात या मैदानाच्या सुरक्षतेसाठी आमचा हा लढा चालूच राहील, असा एल्गार करत या सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला इशारा दिला.

त्याचप्रमाणे सरकारने कोविडच्या काळात कथित 144 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुचेली मैदानाच्या प्रश्नावरून ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविले होते, ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत. यासंदर्भातील निवेदन कार्यकर्त्यांतर्फे राज्यपाल, मुख्यमंत्री, क्रीडामंत्री तसेच बार्देशातील आमदारांना देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय भिके, जितेश कामत यांनी यावेळी दिली.

म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रवीण आसोलकर, सुदेश तिवरेकर, जवाहरलाल शेट्ये व सुनील नार्वेकर हे उपस्थित होते.

जितेश कामत म्हणाले, कुचेली मैदानावर भूखंड पाडून ते विकण्याचे षडयंत्र होते. मात्र, जागृत लोकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी हा डाव हाणून पाडलेला.

त्यामुळेच आमच्यावर हे खोटे गुन्हे नोंदविण्यात आले व आता खटला सुरू आहे. सुनावणी सुरू असल्याने आम्हांला अकारण वारंवार न्यायालयात जावे लागते. मुळात आम्ही कुठलीच चुकीची कृती केलेली नव्हती.

लोकांनी आवाज उठविल्यानंतर म्हापसा पालिकेने नंतर या जागेतील बांधकामास दिलेली परवानगी मागे घेतली होती, अशी आठवण कामत यांनी यावेळी करून दिली. ज्यांनी सत्याच्या व लोकशाही मार्गाने आवाज उठविला, त्यांच्यावर सध्या खटला सुरू असल्याचे कामत म्हणाले.

मैदान पूर्ववत हवे

हे मैदान पूर्ववत करून देणार असे संबंधितांकडून सांगण्यात आलेले. मात्र, अद्याप हे काम झालेले नाही. पोलिसांना हवे असल्यास आगाऊ आमच्यावर आणखी गुन्हे दाखल करावेत. मात्र, मैदान कुठल्याही स्थितीत लोकांच्या व खेळाडूंच्या हातातून आम्ही जाऊ देणार नाही, असेही भिके व प्रवीण आसोलकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT