Traffic Jam  Dainik gomantak
गोवा

Mapusa- Siolim Road: ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने म्हापसा-शिवोली रस्त्यावर वाहतूक कोंडी

Traffic Jam ग्रेनाईट घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहतूक कोंडी

Ganeshprasad Gogate

Traffic Jam शिवोली-म्हापसा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याची घटना घडली असून बंगळूर वरून ग्रेनाईट घेऊन येणाऱ्या एका ट्रक ट्रॉलीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्ता सोडून लगतच्या झाडीमध्ये घुसला हा ट्रक पुन्हा मार्गावर आणण्यासाठी दुसऱ्या ट्रकचा वापर करावा लागणार असल्याचे ट्रॉली चालकाचे म्हणणे आहे.

हा रस्ता अरुंद असून या ठिकाणी दुचाकी, कार यासारखील छोटी वाहने कायम प्रवास करतात. या ओव्हरलोड ट्रॉलीने चुकीचे वळण घेतल्याने ट्राफिक जाम झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हाऊसिंग रोडवरून अशा अवजड वाहनांची वाहतूक करणे योग्य नसून स्थानिक पंचायतीने यावर ठोस तोडगा काढावा असे स्थानिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधीही एक खडीवाहू टेम्पो या रस्त्यावर उलटून एका घराच्या कंपाऊंड भिंतीला हानी पोहोचली होती.

थोडक्यात वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरील वाहनचालकांची गैरसोय आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT