PWD Dainik Gomantak
गोवा

Mapusa PWD: केवळ दैव बलवत्तर म्हणून... म्हापसा पाणीपुरवठा विभागातील 'त्या' प्रकाराने खळबळ

सुदैवाने या घटनेत कार्यालयातील कुणाही व्यक्तीला दुखापत झाली नाही.

Ganeshprasad Gogate

Mapusa PWD: म्हापसा पाणीपुरवठा विभागाच्या इमारतीच्या छताची दुरावस्था झाल्याची चर्चा बरेच दिवस सुरु होती या घटनेसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. बुधवारी (25 ऑक्टोबर रोजी) सकाळी या इमारतीच्या छताला आधार देण्यासाठी उभारलेला लाकडी खांब निखळून पडला. सुदैवाने या घटनेत कार्यालयातील कुणाही व्यक्तीला दुखापत झाली नाही.

दरम्यान सदर इमारतीची दुरावस्था होत चालली असून या घटनेमुळे इमारतींसह येथे काम करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच सदर इमारत जीर्ण झाली असून या इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी केली जात आहे. राज्यातील जुन्या आणि जीर्ण इमारतीं प्रश्नी काँग्रेसचे युरी आलेमाव यांनी सरकारकडे इमारतींच्या देखभाल आणि नूतनीकरणासंबंधी आवाहन केले होते.

सरकारने गोव्यातील सर्व वारसा इमारतींच्या दुरुस्ती, नूतनीकरणाचा कृती आराखडा तयार करावा. इव्हेंट आयोजनावर निधी वाया घालवण्यापेक्षा सरकारने प्रथम या वारसा इमरतींचे जतन करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे आलेमाव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

कांपाल आणि रायबंदर येथील जुने गोमेकॉ इस्पितळ, मडगावचे हॉस्पिसिओ, कांपालचे मॅकेनिज पॅलेस, पणजीत समाज कल्याण खात्याची इमारत, मडगावचे नागरी आरोग्य केंद्र, शिक्षण खात्याची दक्षिण जिल्हा कार्यालय अशा वारसा वास्तू ‘असुरक्षित’ असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘गोवननेस’ म्हणजे पोर्तुगीजपूर्वकालीन गोवा साकारण्याची कल्पकता नव्हे तर..! सांस्कृतिक अधिशेष

Goa Opinion: आंदोलने कितीही चालू असोत, त्यात सरकार ‘यशस्वी’ होते आहे; विकल्प

'गोव्यात हे काय चाललंय'? आधी बाईकला धडक दिली, नंतर अंगावर गाडी घालायचा केला प्रयत्न; चालक गंभीर जखमी

Goa Crime: महिलेला पाठवले अश्लील फोटो, संदेश! फोनवर केली लैंगिक सुखाची मागणी; न्यायालयाने फेटाळला दोषमुक्तचा अर्ज

LPG Gas Cylinder: व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडाच! दुप्पट दर मोजण्याची वेळ; नागरी पुरवठा खात्याने लक्ष देण्याची गरज

SCROLL FOR NEXT