Mapusa Crime: सालीगावमधील मारहाण प्रकरणी कोर्टाचा महत्वाचा निकाल; खटल्यात फिर्यादी पक्षाने...

आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत रॉडने मारहाण करत तसेच जिवेमारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता.
Court
CourtDainik Gomantak

Mapusa Crime: 2016 साली सालीगाव येथील एका मारहाण प्रकरणाचा निकाल कोर्टाने बुधवारी देत आरोपीची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 437-A अन्वये 10,000/- रुपयांच्या जातमुचल्यावर सुटका केली आहे.

16.01.2016 रोजी दुपारी 2 च्या सुमारास आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत रॉडने मारहाण करत जिवेमारण्याची धमकी देऊन दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला होता.

याप्रकरणी सालीगाव पोलिसांनी ब्रेन पी. डिसिल्वा या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकरण कोर्टात गेल्यावर सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपींची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

निर्णय देताना कोर्टाने असे सांगितले की, आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा सादर झाला नसल्याने तसेच खटला टिकून ठेवण्यात फिर्यादी पक्षही अपयशी ठरल्याने आरोपीची मुक्तता करण्यात येत आहे.

न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 248(1) नुसार भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 324 आणि 506(ii) नुसार आरोपींची निर्दोष मुक्तता केली

Court
Goa Assembly Election: फोंड्यात विधानसभा निवडणुकीचे नियोजन सुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com