Joshua D'Souza: येथील मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाची चाचणी पुढील दोन महिन्यांत किंवा जानेवारीच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली.
म्हापसा येथे पहिल्या टप्प्यात प्रभाग 8,9,19 व 20मध्ये सध्या मलनिस्सारणाचे काम सुरु झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मलनिस्सारण महामंडळाने शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविण्याचे काम सुरु केले असून, जोडणीच्या पहिल्या टप्प्यात मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्याचे काम हाती घेतले आहे.
त्यानंतर, घरोघरी जोडणी देण्याचे काम हाती घेणे अपेक्षित आहे. म्हापसा पालिकेने सीवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवाला व्यावसायिक आणि गृहनिर्माण युनिट्ससाठी मलनिस्सारण जोडणी टाकण्यासाठी शहरातील रस्ते कापण्याकरिता ‘ना हरकत’ दाखला जारी केल्यानंतर हे काम हाती घेतले आहे.
सध्या गावसावाडा या प्रभाग 20 मध्ये रस्त्याचे खोदकाम सुरु झाले असून कामरखाजन, गावसावाडो आणि मरड या भागांत काम केले जाणार आहे. उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, आम्ही कनेक्शन टाकण्याचे काम सुरु केले आहे आणि त्यानंतर चार प्रभागांमध्ये होणार्या मलनिस्सारण (सीवरेज लाइनला) घरे जोडली जातील.
आम्ही उत्खननाच्या कामाचा फायदा घेणार आहोत आणि खोदण्याची सर्व काम एकाच वेळी होतील, याची खात्री करणार आहोत. जेणेकरून वारंवार खोदण्याचे काम होणार नाही. आपण हे सुनिश्चित केले आहे की वीज, सिवरेज आणि सार्वजनिक बांधकाम खाते हे सर्व एकमेकांच्या समन्वयाने काम करताहेत. ज्यामुळे लोकांची किमान गैरसोय होईल, असेही डिसोझा म्हणाले.
गेल्या ९ वर्षांपासून प्रकल्प रखडलेला !
सरकारने फेब्रुवारी 2013 मध्ये 80 कोटी रु. खर्चाच्या या मलनिस्सारण प्रकल्पाची पायाभरणी केली होती. यासाठी 15 प्रभागांत 30 किमी. अंतरात वाहिन्या टाकल्या आहेत. कामरखाजन येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणार होता, मात्र नऊ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.