सांगे आयआयटी प्रकल्पाला विरोध वाढतो आहे. तर दुसऱ्या बाजूला मंत्री हा प्रकल्प सांगेत होणारच या भुमिकेवर ठाम आहेत. आज या स्थितीची पुनरावृत्ती घडली असून दांडो (Dando) नागरीकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा प्रकल्प सांगेतच होणार असे म्हटले आहे. त्यामुळे सांगे आयआयटीची धग कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
(Minister Subhash Phaldesai has informed that IIt project will be at Sanguem)
आज मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी हा प्रकल्प सांगेत होणार असल्याची पुन्हा म्हटले आहे. तसेच या प्रकल्पासाठी आणखी 3 लाख चौरस मीटर अतिरिक्त जमीन देण्याची मागणी आपण आमदार या नात्याने सरकारकडे करणार आहे. अशी माहिती दिली आहे. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खाण ट्रक मालकांनी वाहनांवर वाढवलेल्या करांमध्ये सुट देण्याची केली मागणी
गोव्यातील खाण व्यावसायिक ट्रक मालकांनी राज्यातील खनिज वाहतूक पूर्णत: सुरू होईपर्यंत वाहनांवर वाढलेले कर कमी करण्याची मागणी केली होती. यावर मंत्री फळदेसाई यांनी गोवा सकारने सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती आहे.
गोवा हा निर्णय तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील खाण ट्रक मालकांनी खाण क्षेत्रातील वाहनांवर वाढवलेल्या करांमध्ये सुट द्यावी या केलेल्या मागणीला आता यश येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.