Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: गोवा नामकरण समितीतर्फे ढवळीकरांच्या प्रतिमेचे म्हापशात दहन

Mapusa: ढवळीकरांनी मगोप सोडून स्वतःच्या हिमतीवर मडकई मतदारसंघात निवडून येऊन दाखवावे.

दैनिक गोमन्तक

Mapusa: मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी करत नामकरण समितीतर्फे म्हापशात मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी समितीने ढवळीकरांच्या वक्तव्याचा निषेध केला. ढवळीकरांनी मगोप सोडून स्वतःच्या हिमतीवर मडकई मतदारसंघात निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही समितीने ढवळीकरांना दिले.

काल समितीतर्फे म्हापशात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, संजय बर्डे, दीपेश नाईक, जितेश कामत, नारायण गडेकर, सीतेश मोरे व इतर उपस्थित होते. यावेळी सुभाष केरकर यांनी ढवळीकर यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला.

ढवळीकरांनी भूमिका स्पष्ट करावी

मगोपच्या केंद्रीय समितीने मध्यंतरी भाऊसाहेबांचे नाव मोपा विमानतळाला द्यावे, असा ठराव घेतला होता. मात्र, आता भाजप सरकार जो निर्णय घेईल, तो मगोपला मान्य असेल, असे सांगण्यात येते. याबाबत ढवळीकरांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. ढवळीकरांचे खरे प्रेम मगोपवर आहे की, भाजपवर ते स्पष्ट करावे, असे म्हणत संजय बर्डे आणि जितेश कामत यांनी ढवळीकरांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT