Panchayat Election: गोव्यातील पेडणे तालुक्यात 3 महत्त्वाच्या पंचायतींसाठी उद्या होणार मतदान

Election: पेडणे पंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका 9 डिसेंबरला होणार असून, मतमोजणी 11 रोजी होणार आहे.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

Panchayat Election: पेडणे तालुक्यातील हळर्ण, चांदेल-हसापूर आणि कासारवर्णे या तीन पंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका 9 डिसेंबर रोजी होणार आहेत. तर मतमोजणी 11 रोजी होईल. या निवडणुकीत एकूण 4,388 मतदार मतदान करणार आहेत. त्यामध्ये पुरुष 2,235 तर महिला 2,153 आहेत.

कासारवर्णेतील प्रभाग क्र. 3 मधून दिव्यांग दीपेश दिलीप नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेली 10 वर्षे लोकप्रतिनिधींनी मला सरकारी नोकरी मिळवून देऊ, असे आश्वासन दिले.

परंतु मला नोकरी मिळाली नाही. निदान पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावे, तसेच जनतेची कामे करून समाधान मिळवावं, यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, असे दीपेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Goa Panchayat Election
Panjim Smart City: पणजीतील रस्‍त्‍यांची 'स्‍मार्ट खोदाखोदी' मुख्यमंत्र्यांनी दुचाकीवरुन फिरुन पाहावी

तीन गावांमध्ये आजपासून मद्यविक्री बंद

पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे आणि चांदेल-हसापूर येथील पंचायत निवडणुकीनिमित्त तिन्ही गावांच्या अखत्यारित येणाऱ्या क्षेत्रात 8, 9 आणि 11 डिसेंबर असे तीन दिवस मद्यविक्रीला मनाई केली असल्याचा आदेश अबकारी खात्याने जारी केला आहे.

मद्यविक्री परवानाधारक बार आणि रेस्टॉरंट असलेल्यांना रेस्टॉरंट फक्त जेवण देण्यासाठी उघडे ठेवण्याची परवानगी आहे. बार काऊंटर बंद असेल, तसेच निवडणुकीच्या दिवसांमध्ये कोणत्याही मद्याची परवानगी दिली जाणार नाही.

दोघांना निवडणुकीपूर्वीच ‘लॉटरी’

या तिन्ही पंचायतींमधील एकूण 17 प्रभागांमधून 40 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात हळर्णमधून 14, कासारवर्णे 15 आणि चांदेलमधून 11 उमेदवारांचा समावेश आहे. चांदेल-हसापूरच्या प्रभाग क्रमांक दोनमधून प्रजय मळीक आणि हळर्णच्या प्रभाग एकमधून विनोद हरिजन हे दोघे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

  • हळर्ण गाव- (प्रभाग 5) (एकूण मतदार 1538) (पुरुष 786) (महिला 752)

  • कासारवर्णे गाव- (प्रभाग 4), (एकूण मतदार 1086), (पुरुष 548), (महिला 538)

  • चांदेल-हसापूर गाव- (प्रभाग 5), (एकूण मतदार 1764), (पुरुष 901), (महिला 863)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com