giant wheels  Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

Bodgeshwar Jatra 2026: उत्तर गोव्याचे श्रद्धास्थान असलेल्या म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव शुक्रवार, 2 जानेवारी 2026 पासून सुरु होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: उत्तर गोव्याचे श्रद्धास्थान असलेल्या म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव शुक्रवार, 2 जानेवारी 2026 पासून सुरु होत आहे. मात्र, या जत्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. जत्रास्थळी उभारण्यात आलेले मोठे आकाशपाळणे (जायंट व्हील्स) आणि इतर मनोरंजन राईड्सना आवश्यक सुरक्षा परवाने आणि 'एनओसी' नसल्यामुळे गुरुवारी दुपारी प्रशासनाने त्या सर्व राईड्स सील केल्या आहेत.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांनी बुधवारी, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता. जत्रेत उभारण्यात आलेल्या राईड्सना संरचना स्थिरता परवाना (Structural Stability Certificate) आणि इतर अनिवार्य परवाने असणे गरजेचे आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, खोर्जुवेकर यांनी बार्देशचे उपजिल्हाधिकारी वर्षा परब आणि मामलेदार तथा देवालये प्रशासक अनंत मळीक यांना स्पष्ट निर्देश दिले होते की, जर संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नसतील, तर विलंब न लावता हे सर्व खेळ सील करावेत आणि उभारलेली संरचना हटवावी.

पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या मुदतीत संबंधित कंत्राटदारांनी आवश्यक एनओसी आणि सुरक्षा परवाने सादर केले नाहीत. त्यामुळे गुरुवारी दुपारी बार्देशच्या मामलेदारांनी पोलीस बंदोबस्तात जत्रास्थळी धाड टाकली. या कारवाईत दोन मोठे आकाशपाळणे (जायंट व्हील्स) आणि इतर लहान-मोठ्या अशा एकूण 18 ते 20 मनोरंजन राईड्स सील करण्यात आल्या. कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जत्रोत्सवाच्या आनंदावर विर्जण?

श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव पुढील सात दिवस चालणार आहे. गोव्यातील सर्वात मोठ्या जत्रांपैकी ही एक जत्रा असून, इथे हजारो भाविक आणि पर्यटक हजेरी लावतात. जत्रेतील आकाशपाळणे हे मुख्य आकर्षण असते. मात्र, परवान्यांच्या अभावामुळे यंदा हे खेळ सुरु होण्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोणताही परवाना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त न झाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

या आदेशाच्या प्रती बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आणि उत्तर गोवा (North Goa) जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जत्रेत खेळ मांडणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. आता हे व्यावसायिक आवश्यक परवाने सादर करुन राईड्स पुन्हा सुरु करु शकतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, सध्या तरी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रीलचा नाद बेतला जीवावर! हायवेवर स्टंट करताना बाईक डिव्हायडरला धडकली, तिघं तोंडावर आपटले; थरार कॅमेऱ्यात कैद

Bicholim: सणासुदीच्या हंगामात विड्याच्या पानांना आलाय भाव! विड्याच्या पानांचे दर दुप्पट; हळदी-कुंकू उत्सवामुळे मागणीत वाढ

Goa Farming: वायंगण शेतीची मयेत लगबग! यंदा पोषक वातावरणामुळे 'तरवा' लावणीच्या कामांना वेग

Abhishek Sharma: 'मी हिटमॅनच्या पावलावर पाऊल ठेवतोय'! न्यूझीलंडला घाम फोडणाऱ्या युवराजच्या 'शेरा'ची डरकाळी Watch Video

New BJP President Goa Visit: भाजपचं 'यंग ब्रिगेड' मिशन! नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर; राजकीय हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT