Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : डांबरीकरण नव्हे, मलमपट्टी! पहिल्याच पावसात रस्त्याची लागली 'वाट'

सरकारचा अजब कारभार; नागरिक संतप्त

Ganeshprasad Gogate

सत्तरी तालुक्यातील अनेक गावांत उन्हाळ्यात हॉटमिक्स पद्धतीने रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. त्यात वाळपई-ठाणे मार्गाचाही समावेश होता. कोपार्डे येथे हा रस्ता पहिल्याच पावसात खचला. त्याचे वृत्त दैनिक ‘गोमन्तक’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने आता या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे.

त्यामुळे सत्तरी तालुक्यात हॉटमिक्स डांबरीकरण केलेले रस्ते खरेच दर्जेदार बांधले आहेत काय, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. हा रस्ता पूर्वी सखल भागात होता. त्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. लोकांच्या मागणीचा विचार करून कोपार्डेतील मुख्य रस्ता सरकारने रुंद करून तेथे भराव टाकून नवीन रस्ता केला होता. पण पहिल्याच पावसात जून महिन्यामध्ये हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. सध्या येथे मुरूम व दगड टाकले असले, पावसाच्या पाण्यामुळे हा भराव निघून जात आहे.

वाहतुकीस धोका

काही ठिकाणी रस्त्याखालची माती वर आली आहे, तर काही ठिकाणी रस्ते खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. आता या खचलेल्या नवीन रस्त्यांवर चक्क दगड आणि मुरूम घालण्याची नामुष्की संबंधित खात्यावर आली आहे. निकृष्ट पद्धतीने रस्ते बांधल्याबद्दल नागरिकांसह प्रवाशांनीही संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT