Goa Government : वंध्यत्वाला तोंड देणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’; गोवा सरकार करणार मोफत उपचार

आरोग्यमंत्री ; डॉक्टरांची समिती, 15 ऑगस्टपासून गोमेकॉत आयव्हीएफ उपचार
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : वंध्यत्वाची समस्या असणाऱ्यांना आता गोड बातमी आली आहे. गोवा सरकार वंध्यत्वाला तोंड देणाऱ्यांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करणार असून येत्या १५ ऑगस्ट दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘आयव्हीएफ’ उपचार सुरू केले जाणार आहेत.

या उपचारावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. यासाठीच्या राज्य सरोगसी बोर्डाची पहिली बैठक झाली. यावेळी आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा, आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, डॉ. केदार पडते, डॉ. मुरीएल कार्दोसो आणि बोर्ड सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे होते.

Goa Government
Goa Monsoon 2023 : बोगमाळोत कोसळली दरड, फोंड्यात निखळले प्लास्टर; मुसळधार पावसाचा परिणाम

मंत्री राणे म्हणाले, सरकारने स्थापन केलेली समिती राज्यातील आयव्हीएफ उपचारांसाठीच्या सर्व अर्जांची छाननी केली जाईल. तसेच सुविधांची तपासणी करेल आणि आवश्यक मंजुरी देखील देईल. याशिवाय सरोगसी कायद्याद्वारे साहाय्यक पुनरुत्पादक उपचारांवर लक्ष ठेवले जातील. ही समिती सरोगसी सारख्या प्रक्रियांमध्ये कोण प्रवेश करू शकतो. सरोगसी कोणत्या परिस्थिती होऊ शकते, हे निर्धारित करेल.

Goa Government
Goa Monsoon 2023: गोव्यात 8 जुलैपर्यंत बसरणार मुसळधार; गोवा वेधशाळेचा अंदाज

मोफत सुविधा मिळणार

समितीद्वारे २० जुलै रोजी चेकलिस्ट सादर केली जाणार असून महिन्याच्या अखेरी प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आढावा बैठक घेतली जाईल. ऑगस्टच्या मध्यापर्यंत जीएमसीच्या सुपर-स्पेशालिटी ब्लॉकमध्ये वंध्यत्वतज्ज्ञ डॉ केदार पडते यांच्या सहकार्याने मोफत आयव्हीएफ उपचार सुविधा सुरू होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com