Goa and Manipur Election Results 2022 | Assembly election result 2022 live updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात काँग्रेस तर मणिपूरमध्ये भाजप आघाडीवर

भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की काँग्रेस बाजी पलटणार?

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज घोषित केले जात आहेत. दोन्ही राज्यात मतमोजणी सुरू झाली आहे. यासोबतच ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये आजच निकाल येणार आहेत. गोव्यातील 40 विधानसभेच्या जागांसाठी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP), गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि शिवसेनेसह भाजपा, काँग्रेस, AAP, TMC चे 301 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचवेळी, मणिपूरच्या 60 विधानसभा जागांवर हे देखील ठरवले जाईल की, भाजप पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की काँग्रेस (Congress) बाजी पलटणार? मागच्या वेळी मणिपूरमध्ये (Manipur) एन बिरेन सिंग यांनी सरकार स्थापन केले होते, जे 2016 मध्ये काँग्रेस सोडून पक्षात सामील झाले होते. (Goa and Manipur Election Results 2022)

दरम्यान, गोव्यात काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप (BJP) 13 जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 1 आणि जनता दल 2 जागांवर आघाडीवर आहे. पणजीच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. पणजीतून मोन्सेरात रिंगणात असून माजी मुख्यमंत्री (CM) मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचे त्यांच्यासमोर आवाहन आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे गोव्याच्या निकालावर लक्ष ठेवून आहेत वृत्तानुसार, भाजपचे गोवा (goa) प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या हॉटेलमध्ये आहेत. ते अनेक बैठकांचे अध्यक्षपद भूषवत आहेत. फडणवीस हे निकालावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात पोहोचणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

SCROLL FOR NEXT