उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. देशाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या 18 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या युतीची सरकारे आहेत. सहा राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीची सरकारे आहेत. जिथे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 28 टक्के लोक राहतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सत्तेवर आल्यानंतर देशातील किती राज्यात भाजपचे सरकार होते ते जाणून घेऊया? देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भाग भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या अधिपत्याखाली कधी आला? आणि नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस किती आकसली?
नरेंद्र मोदी मे 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. मोदी सत्तेत आले तेव्हा देशातील सात राज्यांमध्ये भाजप (BJP) आणि मित्रपक्षांची सरकारे होती. त्यापैकी पाच राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री होते. त्याचवेळी बिहार आणि पंजाबमध्ये त्यांचा मित्र पक्ष सरकार चालवत होता. देशातील 11 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या दोन राज्यांमध्ये राहते. उर्वरित छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते. देशातील 19 टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. म्हणजेच मोदी सत्तेवर आले तेव्हा जवळपास 30 टक्के लोकसंख्येवर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सरकारे चालत होती.
नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले तेव्हा देशातील 14 राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते. देशाच्या 27 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या काँग्रेसशासित राज्यांमध्ये राहते. या राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन मोठ्या राज्यांचा समावेश होता.
2014 मध्ये सात राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार होते. चार वर्षांनंतर, मार्च 2018 मध्ये, 21 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार होते. देशातील सुमारे 71 टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये राहते. हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्येच्या बाबतीत भाजपची सत्ता शिखरावर होती. त्याचवेळी चार राज्यात काँग्रेसचे (Congress) सरकार होते. या राज्यांमध्ये सात टक्के लोकसंख्या राहते.
आता पुढे काय होणार?
सध्या 18 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यापैकी चार राज्यांमध्ये मतदान झाले. त्यांचा आज निर्णय होणार आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर सध्या 50 टक्के लोकसंख्येवर भाजपची सत्ता आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपची सत्ता असलेल्या दोन राज्यांमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता असली तरी दोन्ही राज्यांतील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.
त्याचबरोबर सहा राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. एक्झिट पोलने भाकीत केले आहे की काँग्रेस पंजाब (Punjab) निवडणुकीत (Election) पराभूत होऊ शकते, तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.