Jit Alorkar Dainik Gomantak
गोवा

Jit Alorkar: अन् चक्क आमदार बनले वाहतूक पोलिस!

Jit Alorkar: आरोलकरांनी वाहतूक कोंडी बघता स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतुकीवर नियंत्रण मिळविले.

दैनिक गोमन्तक

जुनस वाडा-मांद्रे परिसरात काल सायंकाळी आमदार जीत आरोलकर यांना वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. भूमिगत वीजवाहिन्यांसाठी रस्त्याचे खोदकाम वीज खात्याकडून सुरू आहे. आधीच अरुंद रस्ते आणि त्यात पडलेली माती, त्यामुळे रहदारीत अडचणी येत होत्या.

दरम्यान, याठिकाणी पाऊण तास वाहतूक कोंडी झाली. ही माहिती आरोलकर यांना मिळताच त्यांनाच वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्याचे काम करावे लागले. त्यांनी बराच वेळ रस्त्यावर थांबून चालकांना दिशा दाखवून वाहतुकीवर नियंत्रण मिळविले.

दोन-तीन महिन्यांपासून मांद्रेतील रस्ते फोडण्याचे काम वीज खात्याकडून सुरू आहे. रस्त्यांचे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक किंवा धोकादायक रस्त्याची सूचना देणारे फलकही लावलेले नाहीत. साधा वाहतूक पोलिसही तैनात नाही. त्यामुळे एका कार्यक्रमासाठी निघालेल्या आरोलकर यांनाच कोंडीत अडकल्यानंतर रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण करावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT