Goa Lokotsav 2022: काणकोणच्या ग्रामीण भागासाठी लोकोत्सव पोषक ठरणार- अजय लोलयेकर

Goa Lokotsav 2022: आंतरराज्य लोककलेची देवाण-घेवाण होण्याबरोबरच गोव्यात बघण्यासारखे फार काही आहे.
Ajay Lolye
Ajay Lolye
Published on
Updated on

Goa Lokotsav 2022: सभापती रमेश तवडकर यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेला आदर्श युवा संघाचा ‘लोकोत्सव 22’ काणकोणच्या ग्रामीण भागात रोजगाराची नवी दालने उघडण्यास पोषक ठरणार असल्याचे मत लोलये पंचायतीचे पंच अजय लोलयेकर व सरपंच प्रतिजा बांदेकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

‘लोकोत्सव 2022’चा एक भाग म्हणून लोकोत्सवानिमित्त 10 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता दापट येथील गॉड्‌स गिफ्ट सभागृहात देशभरातील सहा लोककला पथकांचा लोककला सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजिला आहे.

या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी लोलये पंचायत सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला सरपंच प्रतिजा बांदेकर, उपसरपंच चंद्रकांत सुदीर, पंच सचिन नाईक, पंकज नाईक, प्रीती पागी, सुप्रिया प्रभुगावकर व माजी सरपंच भूषण प्रभुगावकर उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच भूषण प्रभुगावकर यांनी आदर्श युवा संघाने लोकोत्सवात सर्वसमावेशक तत्त्वं पाळून हा महोत्सव राज्यव्यापी केला, त्याबद्दल आदर्श युवा संघ व या लोकोत्सवाचे प्रणेते सभापती रमेश तवडकर यांचे अभिनंदन केले. या लोकोत्सवात बेरोजगार युवकांसाठी गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Ajay Lolye
Panchayat Election: गोव्यातील पेडणे तालुक्यात 3 महत्त्वाच्या पंचायतींसाठी उद्या होणार मतदान

अजय लोलयेकर, पंच-

या कार्यक्रमामुळे आंतरराज्य लोककलेची देवाण-घेवाण होण्याबरोबरच गोव्यात बघण्यासारखे फार काही आहे, हा वेगळा दृष्टिकोन पर्यटकांमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या लोककला सादरीकरणासाठी गॉड्‌स गिफ्टच्या मालकांनी सभागृह, खुर्च्या, जनरेटर व अन्य साहित्य विनामूल्य दिले आहे.

प्रतिज्ञा बांदेकर, सरपंच-

महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, वनौषधी प्रदर्शन, साहसी उपक्रम, लोकनृत्य स्पर्धा, विद्यालयीन-महाविद्यालयीन व खुल्या गटात विविध स्पर्धांचे आयोजन करून सर्व थरांतील लोकांना या लोकोत्सवात सामावून घेण्याचा प्रयत्न झाल्याने खऱ्या अर्थाने तो पाच दिवसांचा लोकोत्सव ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com