Goa Casino | GCZMA Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: 'GCZMA'ला कॅसिनोंकडून आलेले अर्ज अपूर्णावस्थेत!

Goa Casino: प्राप्त झालेले अर्ज अपूर्ण आणि कागदपत्रांची पूर्तता नसलेले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Casino: मांडवीतील कसिनोंना हरित लवादाने किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकारणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. मात्र यासाठी कसिनोंकडून आलेले अर्ज हे अर्धवट माहितीचे आणि त्रुटीपूर्ण असल्याने (Goa Coastal Zone Management Authority) ‘जीसीझेडएमए’ ने या अर्जांवर असमाधान व्यक्त केले आहे.

‘एनजीटी’च्या निर्देशांनुसार मांडवीत चालणाऱ्या कसिनोंना 12 सागरी मैलांपर्यंतच्या सीआरझेडसाठी ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. प्राप्त झालेले अर्ज अपूर्ण आणि कागदपत्रांची पूर्तता नसलेले आहेत.

तसेच इतर खात्यांकडून आवश्‍यक असलेले ना हरकत दाखले आणि जहाज तपशील सादर करण्याची सूचना अर्जदारांना प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. सर्व दस्तावेज सार केल्यानंतरच अर्जांची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असा निर्णय जीसीझेडएमएचया गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.

कसिनोकडून सीआरझेडसाठी ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कारभार थांबवण्याचा आदेश ‘एनजीटी’ने दिला होता. तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कसिनोंमुळे झालेल्या पर्यावरणाच्या नुकसानीचे मूल्यांकन आणि भरपाई करण्यासही आदेशात स्पष्ट केले होते.

वसूल केलेल्या निधीतून कृती आराखडा तयार करून पर्यावरण पुनर्संचयित करण्यासाठी वापरण्यात करण्याचे नमूद केले होते.

प्राधिकरणाच्या आदेशाला आव्हान

आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी कसिनो नदीच्या 12 सागरी मैलाच्या आत सीआरझेड- 4 अंतर्गत येणाऱ्या भागात हलवण्यात आली असल्याचे एनजीटीने नजरेस आणून दिले होते. हा युक्तीवाद एनजीटीने मान्य करून शेट्ये यांची याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT