Road Safety Decision Dainik Gomantak
गोवा

Helmet Compulsion: बाईकवरून गोव्याला येताय? मागे बसणाऱ्यासाठीही आता हेल्मेटसक्ती; स्पीड डीटेक्शन यंत्रणा आणणार वापरात

Pillion rider helmet Goa: येत्या एप्रिलपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्या दुचाकीस्वारासही शिरस्त्राण (हेल्मेट) परीधान करणे बंधनकारक होऊ शकते. रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: येत्या एप्रिलपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्या दुचाकीस्वारासही शिरस्त्राण (हेल्मेट) परीधान करणे बंधनकारक होऊ शकते. रस्ता सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला होता.

वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या आर्थिक वर्षात वाहतूक कायद्यातील हेल्मेट संदर्भातील नियमांची अंमलबजावणी नको. पुढील आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करता येईल, अशी चर्चा झाली. त्याआधी जनतेला त्याची सूचना केली जाणार आहे. त्यासाठी जनजागृती करण्यासाठी वाहतूक खात्याने पुढाकार घ्यावा असाही चर्चेचा सूर होता, अशी माहिती मिळाली आहे.

रस्ते सुरक्षित करण्यासाठी रस्त्याiवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याबरोबर रस्त्यांची संयुक्तपणे पहाणी करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत झाला. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंगच्या तपासणीसह कामाच्या वेळी बॅरीकेडिंगची कार्यवाही करण्यावरही चर्चा झाली. बैठकीला वाहतूक, पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की सर्वोच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना पादचारी सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. रस्ते व वाहतूक विषयक केंद्रीय मंत्रालयाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशांनुसार पादचारी सुरक्षेचा सखोल आढावा, स्वतंत्र नियमावली तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘स्पीड डीटेक्शन’चा होणार अवलंब

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रस्ते अधिकाधिक सुरक्षित बनण्यासाठी रस्त्याच्या बाजूच्या बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल. वाहनांचा आकडा वाढल्याने रस्ता ओलांडणे धोकादायक बनत आहे. यावर उपाय म्हणून झेब्रा क्रॉसिंगची पहाणी करून त्यांचे योग्यरित्या मार्किंग करण्यात येईल.

तसेच रस्त्याची दुरूस्ती सुरू असल्यास कंत्राटदाराला बॅरीकेडिंग करणे सक्तीचे असेल. अतिक्रमणे, झेब्रा क्रॉसिंग, बॅरीकेडींगच्या कार्यवाहीसाठी संयुक्तपणे रस्त्यांची पहाणी करण्यावर भर असेल. वाहतूक नियम उल्लंघनावर नजर ठेवून दंड आकारण्यासाठी ‘स्पीड डीटेक्शन’ यंत्रणा व कॅमेऱ्यांचा अवलंब केला जाणार आहे.

दुचाकीच्या मागे बसणाऱ्याला (पिलियन रायडर) हेल्मेट सक्तीचे करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक आहे. याबाबत प्रभावीपणे जागृती केली जाईल.
प्रविमल अभिषेक, वाहतूक संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT