High maintenance cost of EV Dainiak Gomantak
गोवा

Mapusa Electric Scooter Protest: "90 हजारांची बॅटरी परवडणार कशी" ? म्हापशात ई-स्कूटरची चक्क बँजो वाजवत धिंड !

High maintenance cost of EVs : वाढती महागाई तसेच पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला कल वळवला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: वाढती महागाई तसेच पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला कल वळवला आहे. मात्र, याच इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी खराब झाल्यावर काय होऊ शकते याचा एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक अनुभव काल म्हापसा शहरात पाहायला मिळाला. बॅटरी बदलण्यासाठी कंपनीने तब्बल ९० हजार रुपयांची मागणी केल्याने संतापलेल्या एका ग्राहकाने चक्क बँजो वाजवत आपल्याच स्कूटरची चपलांचा हार घालून शहरातून धिंड काढली अन् दुचाकीला एकप्रकारे प्रतीकात्मक निरोप दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने आपली इलेक्ट्रिक स्कूटर बिघडल्याने दुरुस्तीसाठी अधिकृत शोरूममध्ये नेली होती. तिथे तपासणी केल्यानंतर व्यवस्थापक तसेच मेकॅनिकने सांगितले की, गाडीची बॅटरी पूर्णपणे निकामी झाली असून ती बदलावी लागेल. दुर्दैवाने या बॅटरीची वॉरंटी संपली होती. मात्र, जेव्हा शोरूमने नवीन बॅटरीची किंमत ९० हजार रुपये असल्याचे सांगितले, तेव्हा ग्राहकाचे धाबे दणाणले.

नवीन गाडीच्या किमतीच्या जवळपास ५० ते ६० टक्के रक्कम केवळ बॅटरीसाठी खर्च करावी लागणार असल्याने त्या ग्राहकाचा संयम सुटला. शोरूमच्या व्यवस्थापनाने कोणताही दिलासा न दिल्याने या ग्राहकाने एक मालवाहू रिक्षा भाड्याने घेतली आणि त्यात आपली बंद पडलेली स्कूटर ठेवून सोबत बेंजो पथक बोलावले. आधी शोरूम समोर व नंतर म्हापसा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून बेंजोच्या तालावर ही प्रतीकात्मक धिंड काढली. तसेच ९० हजारांची बॅटरी परवडणारी नाही, असा मूक संदेश तो या रॅलीतून देत होता. ही ‘धिंड’ पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांनी गर्दी केली होती.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विश्वासार्हतेवर आणि त्यांच्या बॅटरीच्या अवाढव्य खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर बॅटरीची किंमतच गाडीच्या किमतीएवढी असेल, तर सामान्यांनी ही वाहने घ्यायची का? असा सवाल वाहनधारक विचारत आहेत. ही घटना केवळ एका ग्राहकाचा संताप नसून एकंदर ई-वाहनांच्या देखभाल खर्चाबाबत असलेल्या भीतीचे ज्वलंत प्रतीक मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT