Old Goa Police Dainik gomantak
गोवा

Old Goa Police: ओल्ड गोवा पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकची चोरी, ITI खोर्ली जवळ होता पार्क

कामगार झोपलेल्या अवस्थेत असताना तीन आठवड्यांपूर्वी एका शेडमध्ये भरधाव ट्रक घुसला.

Pramod Yadav

Old Goa Police: ओल्ड गोवा पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकची चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या ट्रक चोरला पोलिसांनी अटक केलीय. अपघातातील ट्रक खोर्ली येथे पार्क करण्यात आला होता, परिसरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने ट्रकची चोरी केली होती.

शिवराम रमाकांत कदम (रा. इंदिरानगर, चिंबल) अस अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार झोपलेल्या अवस्थेत असताना तीन आठवड्यांपूर्वी एका शेडमध्ये भरधाव ट्रक घुसला. रात्रीच्या वेळेस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन ट्रक ताब्यात घेतला होता.

ताब्यात घेतलेला ट्रक आयटीआय खोर्ली येथे पार्क करण्यात आला होता. संशयित चोरट्याने परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत ट्रकची चोरी केली. पोलिसांना माहिती मिळताच संशयिताला अटक करुन, ट्रक पुन्हा जप्त करण्यात आला आहे.

ओल्ड गोवा पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे सध्या काम सुरु असून, स्थानक तात्पुरत्या कालावधीसाठी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेला ट्रक खोर्लीत पार्क करण्यात आल्याचे पोलीस म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: "आम्ही मतांचे राजकारण करत नाही,गोव्याच्या भल्यासाठी काम करतोय!" EHN वादावर मुख्यमंत्र्यांचे सरदेसाईंना 'सडेतोड' उत्तर

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

Goa Assembly Live: EHN योजनेमुळे 'अज्ञात' घरांना ओळख

Loliem: लोलयेवासीय गावाची 'अधोगती' पाहत राहतील की 'विरोध' करण्यास सज्ज होतील?

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

SCROLL FOR NEXT