Goa malaria cases last 9 years zero deaths report Dainik Gomantak
गोवा

Goa Malaria Cases: मलेरियावर यशस्वी मात! गेल्या 9 वर्षात एकाचाही मृत्यू नाही, दरमहा सरासरी 93 रुग्ण तरीही नियंत्रण कायम!

Goa Malaria Free Status 2026: राज्‍यात २०१७ नंतर मलेरियामुळे एकाही व्‍यक्तीचा मृत्‍यू झालेला नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यात २०१७ नंतर मलेरियामुळे एकाही व्‍यक्तीचा मृत्‍यू झालेला नाही. सध्‍या राज्‍यात प्रत्‍येक महिन्‍याला मलेरियाचे सरासरी ९३ रुग्‍ण आढळत असल्‍याचे आरोग्‍य खात्‍याच्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

२०१७ मध्‍ये गोव्‍यात मलेरियामुळे एका व्‍यक्तीचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर मात्र राज्‍यात मलेरियाने मृत्‍यू झाल्‍याचे एकही प्रकरण घडलेले नाही, अशी माहिती संसर्गजन्‍य आजारांच्‍या तज्‍ज्ञ डॉ. कल्‍पना महात्‍मे यांनी गुरुवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

२०२३ पासून आतापर्यंत एकाही गोमंतकीयाला मलेरियाची लागण झालेली नाही. जे रुग्‍ण आढळून येतात, ते इतर राज्‍यांतून गोव्‍यात आलेले असतात. त्‍यांना मलेरियाची लागण झाल्‍याचे समजताच त्‍यांच्‍यावर तत्‍काळ उपचार सुरू केले जातात.

शिवाय ते ज्‍या राज्‍यांतून गोव्‍यात आलेले असतात, त्‍या राज्‍यांतील आरोग्‍य खात्‍यांना त्‍याबाबतची तत्‍काळ माहिती देण्‍यात येते. सोबतच गोव्‍यातील ज्‍या भागांत त्‍यांचे वास्‍तव्‍य असते, त्‍या भागांत जाऊन मलेरियाचा फैलाव होऊ नये, याबाबतच्‍या आवश्‍‍यक त्‍या सर्व उपाययोजना आरोग्‍य खात्‍याचे कर्मचारी हाती घेतात, असेही डॉ. महात्‍मे यांनी सांगितले.

नियंत्रणासाठी सरकारची सकारात्‍मक पावले

आरोग्‍य खात्‍याकडून दरवर्षी मलेरियावर नियंत्रण आणण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍‍यक ते सर्व उपाय योजले जातात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. वर्षभर दर पंधरा दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवली जाते. पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे शोधून ती कोरडी केली जातात.

ग्रामपंचायती तसेच नगरपालिकांच्या मदतीने कीटकांच्या संभाव्य प्रजननाच्या जागा तपासण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाते आणि पत्रके व माहितीपत्रके वितरित केली जातात.

मलेरियाची लागण डासांमुळे होत असल्‍यामुळे डासांची पैदास रोखण्यासाठी वापरात नसलेल्या विहिरी, तलावांमध्‍ये मान्सूनपूर्व काळात मासे सोडण्याची मोहीम राबवली जाते. गतवर्षी सुमारे ३,७८२ ठिकाणी अशाप्रकारे मासे सोडण्‍यात आले होते.

‘गोवा सार्वजनिक आरोग्य अधिनियम, १९८५’नुसार बांधकाम स्थळांवरील कामगारांची तपासणी करणे अनिवार्य करण्यात आल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याच्‍या सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT