Goa Drug Case: 'PSI'ऐवजी कॉन्स्टेबलने झडती घेतल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता, तपासातील त्रुटी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या पथ्यावर

Prasad Walke NDPS Case Goa: अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) सुरू असलेल्या एका खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी प्रसाद वाळके याची निर्दोष मुक्तता केली आहे.
Goa drug case accused acquitted due to investigation error
Goa drug case accused acquitted due to investigation errorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) सुरू असलेल्या एका खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी प्रसाद वाळके याची निर्दोष मुक्तता केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील अनिवार्य कलमांचे उल्लंघन केल्याचे तसेच प्रक्रियेत गंभीर त्रुटी ठेवल्याने गंभीर ताशेरे ओढत न्यायालयाने हा निकाल दिला.

८ ऑगस्ट २०२३ रोजी अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी प्रसाद वाळके याच्याकडून १५ ग्रॅम एमडीएमए, १५ ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि ३० ग्रॅम गांजा जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी वाळके याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम २२(सी) आणि २०(बी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Goa drug case accused acquitted due to investigation error
Goa Teacher Recruitment: 760 जण 'सीबीटी-2' साठी पात्र, यादी जाहीर; 390 जणांची होणार भरती

नेमके काय घडले?

नियमानुसार, एनडीपीएस प्रकरणात आरोपीची झडती ही पोलिस उपनिरीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याने घेणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या सूचनेनुसार एका कॉन्स्टेबलने आरोपीची झडती घेतली. कॉन्स्टेबलने घेतलेली आरोपीची झडती कायद्याला धरून नाही, असे स्पष्ट मत न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com