Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'वर दिवसरात्र लक्ष, लवकरच रेस्क्यू करण्यात येणार; वन विभागाचे पथक पाळतीवर

Omkar Elephant Update: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काही दिवसांपासून बागायतीचे नुकसान करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीची पकड मोहीम (रेस्क्यू ऑपरेशन) वन विभागाच्या खास पथकाने हाती घेतले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सावंतवाडी: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काही दिवसांपासून बागायतीचे नुकसान करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीची पकड मोहीम (रेस्क्यू ऑपरेशन) वन विभागाच्या खास पथकाने हाती घेतले आहे. तशा प्रकारची परवानगीही सिंधुदुर्ग वन विभागाला मिळाली आहे.

रेस्क्यू पथक ओंकारच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. लवकरच त्याला रेस्क्यू करण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिली. दोडामार्गमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीच्या कळपापैकी ओंकार हत्ती हा सध्या सावंतवाडी तालुक्यातील कास-सातोसे गावांमध्ये स्थिरावला आहे.

अलीकडेच तो सिंधुदुर्गच्या सीमेवरील गोवा राज्यातील काही भागांमध्ये पोहोचला होता. तेथून त्याने पुन्हा एकदा सावंतवाडीतील कास गावामध्ये मुक्काम ठोकला आहे. कास गावामध्ये शेती, तसेच बागायतींचे नुकसान करत आहे.

वन विभागाचे एक पथक त्याच्या मागावर दिवसरात्र असून, त्याच्या एकूणच हालचालींचा अभ्यास या टीमकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ‘ओंकार’ हत्तीचे वय सुमारे १० वर्षे असून तो अधिक आक्रमक नाही. मात्र, त्याच्याकडून शेतीत होणारे नुकसान पाहता त्याला लवकरच रेस्क्यू करण्यात येणार आहे. ही मोहीम सुरू केली आहे.

ओंकार हत्तीला बेशुद्ध करून सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी काही ठिकाणांची निश्चिती केली आहे. महाराष्ट्र वन विभागाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी थेट हत्तीसमोर जाऊ नये. तो कुठेही दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे, वन विभाग तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे.
मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT