Omkar Elephant: 'ओंकार'कडून 30 शेतकऱ्यांचे नुकसान, 'शेतकरी आधार निधी'तून नुकसान भरपाईची हमी

Omkar Elephant crop damage: ओंकार हत्तीने पेडण्यातील तांबोशी, उगवे आणि मोपा अशा तीन गावांतील सुमारे ३० शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान केलंय.
Omkar Elephant
Omkar ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: ओंकार हत्तीने पेडण्यातील तांबोशी, उगवे आणि मोपा अशा तीन गावांतील सुमारे ३० शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

या अहवालानंतर बाधित शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधीच्या माध्यमातून भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.

फळदेसाई म्हणाले, “सध्या उपलब्ध माहितीनुसार तांबोशी गावातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. परंतु येत्या दोन-चार दिवसांत पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नेमकी स्थिती स्पष्ट होईल. नुकसान किती झाले याचा तपशीलवार अहवाल मिळाल्यावर त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल.”

Omkar Elephant
Goa Education: 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच यापुढे पहिलीमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

दरम्यान, ‘ओंकार’ हत्तीमुळे शेतकऱ्यांचे सातत्याने होणारे नुकसान आणि त्रास कमी करण्यासाठी वनखात्याकडून विविध प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी कृषी खात्याने देखील आवश्यक त्या सोयी-सुविधांसाठी, विशेषतः रस्ता मोकळा करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागणीबाबत पाठपुरावा केला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.

Omkar Elephant
Goa Multiple Accident: चार अपघातांत 4 ठार, पाचजण जखमी; गोव्यात दसऱ्याच्या एक दिवस अगोदर अपघातांचे सत्र

‘ओंकार’ हत्तीमुळे झालेल्या या नुकसानीमुळे पेडण्यातील शेतकरी पुन्हा एकदा भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भातील पुढील उपाययोजना ठरवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com