Chhatisgarh  Dainik Gomantak
गोवा

गोवा बनावटीची दारू सापडली छत्तीसगढमध्ये, पोलिसांनी घरावर टाकला छापा अन्...

गोवा बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणावर इतर राज्यात तस्करी केली जाते.

Pramod Yadav

गोवा बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणावर इतर राज्यात तस्करी केली जाते. यासंबधित वारंवार कारवाई केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात अशा घटना नेहमी समोर येतात, शिवाय गोव्यातून या राज्यात जाणाऱ्या मार्गावर नेहमीच पोलिसांचा कडा पहारा असतो.

(Goa Made liquor Seized in Chhattisgarh)

छत्तीसगढ येथील बालोदा बाजार येथे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. भाटापारा परिसरातील कोडवा गावात ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका घरावर छापा टाकून 35 बॉक्स दारू जप्त केली आहे.

अजय रमेश यदू (वय 30, रा. भाटापारा, कोडवा, छत्तीसगढ) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

जिल्हाधिकारी रजत बन्सल यांच्या सूचनेवरून उत्पादन शुल्क विभागाकडून विविध भागात सतत गस्त व कारवाई करण्यात येत असते. अशाच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गस्तीदरम्यान हा मद्यसाठा आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजय रमेश यदू याच्या घरातून 1680 नॉन ड्युटी गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.

आरोपीविरुद्ध छत्तीसगढ अबकारी कायदा 1915 चे कलम 34(1) (अ) 34(2) 59 के 36 नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी समीर मिश्रा, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक जलेश सिंग, डॉ.सुकांत पांडे, विपीन पाठक उत्पादन शुल्कचे मुख्य हवालदार राधागिरी गोस्वामी, देवीप्रसाद तिवारी, चालक अनु धिवार यांनी ही कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 19 वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी कांदोळी येथील तरुणाला अटक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT