ऑक्टोबर 2013 च्या पर्रा दंगल प्रकरणात चार नायजेरियन नागरिकांची म्हापसा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. लोबो वाडो, पार्रा येथे घडली होती. नायजेरियन नागरिकांनी पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग-17 वर रस्ता रोखो केले होते.
"पोलिस अधिकार्यांवर बळाचा वापर केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. कोणत्याही प्रकारचा प्राणघातक हल्लाही सिद्ध झाला नाही." असे म्हापसा न्यायालयाने म्हटले आहे.
संडे ओन्ये लकी, मवाचुकवू एल्ग्वेडिम्मे, अरेन्झ उकेमोझी आणि इफेनिल पास्कोल अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या चार नायजेरियन नागरिकांची नावे आहेत.
या प्रकरणात फरार असलेल्या आणि ज्यांच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही अशा अन्य 15 आरोपींना स्टँडिंग वॉरंट जारी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात नायजेरियन संशयितांवर धमकी देणे, दंगा करणे, हल्ला करणे, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण, गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आले होते.
दरम्यान, "संशयित आरोपी जर उपद्रव निर्माण करत असतील, पोलिस अधिकार्यांना त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावण्यापासून किंवा कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यापासून रोखत असतील, तर त्यांना लोबो वाडो, पर्रा येथी घटनास्थळी का अटक करण्यात आली नाही," असे निलिमा काणकोणकर म्हणाल्या.
"जमलेला जमाव मृत नायजेरियन नागरिक ओबोडो उझोना सिमोन याचा मृतदेह पाहण्यासाठी जमा झाले होते, त्यावरून त्यांचा जमाव बेकायदेशीर होता असा निष्कर्ष काढता येणार नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.
गुन्हा 31 ऑक्टोबर 2013 रोजी घडला होता, परंतु घटनेचा पंचनामा दुसऱ्या दिवशी करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांना पंचनामा त्याच दिवशी करण्यास कशामुळे प्रतिबंधित केले असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कोर्टाने पुढे असे म्हटले की, तपास अधिकाऱ्याने सांगितले की तक्रारीत नमूद केलेल्या 20 आरोपींची नावे सर्व बाबतीत बरोबर आहेत की नाही हे ते सांगू शकत नाही, कारण त्यांनी कोणतीही कागदपत्रे किंवा पासपोर्टसह त्याची पडताळणी केलेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
ऑक्टोबर 2013 मध्ये शेवटच्या आठवड्यात पर्रा येथे नायजेरियन नागरिक ओबोडो सिमोन मृतावस्थेत आढळून आला होता, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, त्यानंतर नायजेरियन नागरिकांनी त्यांच्या देशबांधवांना घेऊन जाणारी श्रवण व्हॅन अडवली, ज्यामुळे कथित दंगल झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी या हत्येचा अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध असल्याचे म्हटले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.